आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तृत्ववान महिलांचा उद्या सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जागतिक महिलादिन व स्व.श्रीमती इंदुबाई गुलाबराव सावंत यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त स्व. इंदुबाई गुलाबराव सावंत प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 9) विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘महिला कर्तृत्व गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते गौरव केला जाणार असून, सोहळ्यात त्यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली. प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होतो आहे.
यांचा होणार गौरव
सुनीता पाटील (सामाजिक), हिराबाई चव्हाणके (चित्रपट), स्नेहल विधाते (क्रीडा), उषा सावंत (साहित्य), अनिता जयसिंग पाटील-चव्हाण (प्रशासन), अश्विनी बोरस्ते (सहकार), आदिती वाघमारे (हास्ययोग), डॉ. रार्जशी कुटे (वैद्यकीय), र्शद्धा माने (शिक्षण).