आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीप्रश्नी महिलांचा हंडा मोर्चा, काही भागात शनिवारी पाणीपुरवठा झाल्याने रहिवासी संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पूर्वविभागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अचानक लिकेज झाली. यामुळे अनेक भागात शनिवारी पाणीपुरवठा झाल्यामुळे संतप्त महिलांसह नगरसेविका रंजना पवार यांनी जीपीआेरोडवरील जलकुंभावर मोर्चा काढून निदर्शने केली.
जुने नाशिक भागातील प्रभाग २९ मधील नाईकवाडीपुरा, फकीरवाडी, नानावली भागात शनिवारी पाणीपुरवठा झाला नाही. प्रभाग ३९ मधील सारडा, इगतपुरी चाळ या भागातही गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. तर, शनिवारी जीपीआेरोडवरील बी. डी. भालेकर शाळेजवळील पूर्व विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत बिघाड आल्यामुळे या भागात पाणीपुरवठा झाला नाही. यामुळे शनिवारी सकाळपासूनच महिलांनी बुधवार पेठेतील जलकुंभासह जीपीआेरोडवरील जलकुंभावर गर्दी करण्यास सुरुवात केली. तसेच प्रभाग २६ मधील खडकाळी भागात रात्री ११ वाजता पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे या परिसरातील महिलांनी हंडा मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी वैभव खैरे, नाना पवार, अर्चना भगत, आशा साळवे, एस. शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

जलवाहिनीत बिघाडामुळे अडचण...
जीपीआेरोडपरिसरातीलजलवाहिनीत अचानक बिघाड आल्यामुळे बुधवारपेठसह इतर भागात पाणीपुरवठा करता आला नाही. तसेच खडकाळीत होणाऱ्या रात्रीच्या वेळेत पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्यात येईल. एन. जे. वाडिले, उपअभियंता,पाणीपुरवठा विभाग

रात्री पाणीपुरवठा...
जुने नाशिक परिसरात पाणी कधी येते, तर कधी येत नाही. खडकाळी भागात तर रात्री ११ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा केला जातो. सध्या थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी पाणी भरण्याची वेळ या भागातील रहिवाशांवर येत आहे. अर्चना भगत, नागरिक

नेहमीच त्रास...
प्रभाग२९ मधील अनेक भागांत पाणीपुरवठाच होत नसल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगरसेवकांना बदनाम होण्याची वेळ आली आहे. तर, शनिवारी पूर्वसूचना देता पाणीपुरवठा बंद केले. रंजना पवार, नगरसेविका
बातम्या आणखी आहेत...