आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ‘वॉव’ संस्थेतर्फे मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाई सतत मोबाइल, मौजमजा करण्यातच गुंतलेली असते. मात्र, याला फाटा देत समाजाला काही देणे लागतो, या भावनेतून ३० तरुण मुलींनी वुमन आॅफ वर्थ अर्थात ‘वॉव’ हा ग्रुप स्थापन करून अनाथाश्रमातील मुलांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अशा मुलांच्या शिक्षणासाठी अार्थिक मदतीसाेबत अारोग्यासाठी विविध शिबिराचेही आयोजन केले जाते.
अनाथाश्रमातील मुलांना मायेचा, मदतीचा हात देण्यासाठी या तरुणींनी या ग्रुपची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून दर महिन्याला सेलिब्रेशन, पार्टीवर होणारा खर्च वाचवून त्या पैशांतून अनाथाश्रमातील मुलांना पुस्तके, वह्या दिल्या जातात. याबरोबरच या मुलांची अारोग्य तपासणी त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यात बदलत्या ऋतूप्रमाणे अारोग्याची काळजी घेणे, आरोग्य संवर्धनासाठी आहार कसा असावा, याबाबत मार्गदर्शन केले जाते. या ग्रुपच्या अंकिता पारख, निकिता खिंवसरा, अवनी वारे, श्रद्धा पहाडे, रितू चतुरमुथा, अवनी वारे, दिव्या गुजराल, स्मृती डुंगरवाल आदी सदस्य या उपक्रमात सहभागी असतात. विशेष म्हणजे, दर महिन्याला ग्रुपचे सदस्य शहरातील अनाथाश्रमात या मुलांसोबत एक दिवस घालवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

निराधार मुलांना मायेचा आधार आवश्यक
^अनाथाश्रमातील मुलांना अार्थिक मदतीबरोबरच प्रेमाचा, मायेच्याही आधाराची आवश्यकता असते. वॉव ग्रुपच्या माध्यमातून सदस्य या मुलांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतात. - श्रद्धा पहाडे, ग्रुपसदस्य

बातम्या आणखी आहेत...