आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिलांचा विलंब महापालिकेकडूनच, जिल्हा प्रशासनाकडून पालिकेला लेखी पत्र; महापालिकेची होणार कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थातील चहा-नाश्ता-जेवणाची महिला बचत गटांची बिले देण्यास जिल्हा प्रशासनाने विलंब केल्याच्या महापालिकेने केलेल्या अाराेपाला जिल्हा प्रशासनाकडून लेखी खडेबोल सुनावण्याची तयारी सुरू झाली आहे. ही बिले पाठविण्यासाठी महापालिकेकडूनच विलंब झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सप्रमाण या पत्रात नमूद करत पालिकेचे पितळच उघडे पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सिंहस्थामध्ये महिला बचत गटांनी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना चहा-कॉफी-नाश्ता आणि जेवण पुरविले होते. त्यात जिल्हा परिषद आणि पालिकेअंतर्गत येणाऱ्या बचत गटांचा समावेश होता. जिल्हा परिषदेने आपल्या बिलांचा प्रस्ताव ठरल्यानुसार वेळेत सादर करत पर्वणीनंतर लागलीच ती मंजूरही करून घेत अदाही केली.

पण, पालिकेने प्रत्यक्षात त्यांच्या अखत्यारीतील बचतगट असल्याने प्रथम त्यांनीच ती बिले मंजूर करणे अपेक्षित होते. त्यानंतर त्यांच्या ठेक्याचे प्रस्ताव हे पर्वण्यांपूर्वीच सादर करत, पर्वण्यांनंतर लागलीच बिलेही सादर करणे अपेक्षित होते. पण त्यांनी ती सप्टेंबरऐवजी डिसेंबरमध्ये सादर केली. त्यातही चार बचत गटांची खोडाखाड असतानाही ती दुरुस्तीशिवाय संशयास्पदरित्याच जशीच्या तशीच प्रशासनाकडे सादर केली.

एवढेच काय वाढीव बिलांच्या रकमेसाठी कुठलीही लेखी मागणी करता ती प्रत्यक्षात आपल्याच विभागाकडे अडकवून ठेवत महिलांचा रेटा वाढल्यानंतर ऐनवेळी तत्काळ मंजुरीची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्याचा प्रयत्न केला. शिवाय इथपर्यंतच थांबता पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांवरही आरोप केले. त्याची परतफेड म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पालिकेला लेखीच दणका देत बिलांना तुम्हीच विलंब केल्याची त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लेखी पत्रच प्रशासनाकडून काढण्यात येत आहे. त्यामुळे आता या बिलांच्या कारणामुळे आता महापालिका अाणि जिल्हा प्रशासनातच जुंपली असून, पालिका निवडणुकीतही याचे पुढील वर्षी परिणाम दिसण्याची शक्यता वाढली आहे.
बातम्या आणखी आहेत...