आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Saving Group Departmental Performance In Nashik

हस्तकलेसोबत खाद्यपदार्थांची लज्जतही, बचतगटाने तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनाला उदंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चुलीवरील भाजलेला खरपूस मांडा, खान्देशी भरीत, कोकणची नागलीची भाकर, निफाडच्या द्राक्षांचे औषधी ज्यूस ते माशांचे विविध खाद्यपदार्थ, हाताने विणकाम करून तयार केलेले मायक्रोन, रुखवत, स्वयंपाकासाठी हातसडीचे तांदूळ, नागली, कुरडई, पापड, सुकलेली हरभरा भाजी अशा कितीतरी पदार्थांसोबतच गृहोपयोगी वस्तू खरेदीची संधी नाशिककरांसाठी महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित विभागीय प्रदर्शनातून चालून आली आहे.राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गंत नाशिक विभागातील महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी तयार केलेल्या वस्तंूच्या विक्रीसाठी आणि प्रसिद्धीसाठी १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर विभागीय प्रदर्शन सुरू आहे. नाशिक,जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यातील सुमारे २३० बचतगटांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. शनिवारी प्रदर्शनातील वस्तू खरेदीसाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शनामध्ये हरभरा, हातसडी तांदूळ, नागली, आले, हळद, लसणाची चटणी, लोणचे, कुरडई, रजई, मसाला, मिरची यासह नव्याने विकसित मेडीका द्राक्षांचे ज्यूस विक्रीसाठी होते. महिला बचतगटांना मोफत स्टॉल्स देण्यात आले असून, त्या माध्यमातून महिलांच्या कलेला व्यासपीठ मिळाले.
वस्‍तूंना चांगली मागणी-
शहरातीलमहिला कलेला दाद देताना दिसतात. हाताने तयार केलेल्या वस्तंूना चांगली मागणी होत अाहे. साधनाभंगाळे, आदिशक्तीमुक्ताई बचतगट

समाधानकारक प्रतिसाद
प्रदर्शनाच्यामाध्यमातून दुसऱ्या दिवशी समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या दोन दिवसांत सुटी असल्याने गर्दीत वाढ होईल. शकुंतलाअहिरे, मैत्रीमहिला बचतगट, दहिवड
विभागीय महिला बचतगटांच्या वस्तू प्रदर्शनात खरेदी करताना महिला. दुसऱ्या छायाचित्रात महिलांनी पदार्थ विक्री प्रदर्शनात द्राक्षांच्या ज्यूसची चव घेतली.