आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेची सोशल मीडियावर बदनामी, पती-मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन केला बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फेसबुकवरील मैत्री एका शिक्षिकेला चांगलीच महागात पडली असून मैत्रीच्या जाळ्यात अाेढणाऱ्या नराधमाने शिक्षिकेला तिच्या पती मुलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात उघडकीस अाला अाहे. या प्रकरणात सरकारवाडा पाेलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवित संशयित वाळू ठेकेदार संजय विश्वास पाटील यास अटक केली अाहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यात साेशल मीडियाद्वारे बदनामी करण्याची धमकी देत तब्बल १८ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे पाेलिसांनी उघडकीस अाणले अाहेत.
 
नाशकातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असलेल्या विवाहितेबाबत असा प्रसंग घडल्याने तिच्या कुटुंबियासह नातलग शिक्षक वर्गात खळबळ उडाली अाहे. यातील पीडितेने तिच्या पतीला विश्वासात घेऊन संशयिताच्या अत्याचाराची कथा सांगताच त्याने पत्नीला धीर देत पाेलिसांत तक्रार देण्याची तयारी दर्शवली. शिक्षिकेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०१६ या कालावधीत संशयित संजय विश्वास पाटील (रा. अंमळनेर, जळगाव) याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. फेसबुकवर पाटील याने ‘माझी एक मैत्रीण असून आमच्यात ब्रेकअप झाला आहे. तू जुळवून देशील का?’ असे विचारत चॅटिंगबराेबर माेबाइलवर बाेलणे सुरू केले. याविषयावर बाेलण्यासाठी अापल्याला मध्यवर्ती भागातील एका हॉटेलमध्ये जेवण्यास बाेलवले. सुरुवातीला मैत्रीच्या गप्पा करीत मैत्रीणीने बाेलणे बंद केल्याने तुलाच काहीतरी करावे लागले, असे सांगितले. त्यानंतर थंडपेय पिण्यास दिले. थंडपेय प्राशन केल्यानंतर तिला भाेवळ अाली. या शीतपेयात त्याने गुंगीचे अाैषध टाकले हाेते. यानंतर हाॅटेलमध्ये नेवून तिथे विवस्त्र केले. माझे फाेटाे शूट केले. त्यापाठाेपाठ बलात्कार करीत त्याची क्लिप बनविल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. 

पीडितेने तक्रारीत पुढे म्हटले की, या घटनेनंतर पुन्हा काही दिवस उलटत नाही ताेच, माझ्याविरूद्ध पाेलिसात तक्रार दिली अथवा कुठे चर्चा केली तर क्लिप फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. याचाच अाधार घेत मला नाशकातील हिरावाडी, पंचवटी येथील खासगी जागेत तर चाळीसगाव, शिर्डी येथे हाॅटेलवर नेवून पुन्हा शारीरीक अत्याचार केले.
 
या प्रकाराला कंटाळून बदनामीच्या भितीने अखाती देशात नोकरीसाठी निघून गेली. मात्र, वारंवार फोन, सोशल मीडियावर चॅटींग करीत पुन्हा फाेटाे व्हायरल करण्याची आणि पतीसह मुलांना ठार करण्याची धमकी देऊन संर्पक साधला. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर २०१६ मध्ये परदेशातून परत येताच मुंबई विमानतळावर दाखल हाेत तिथून कारमने शिर्डीत नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले. संशयित पाटीलचा जाच वाढत गेल्याने त्यामुळे जगणेच असह्य झाल्याने हा प्रकार पती कुटुंबियांना सांगितल्यानंतर बुधवारी(दि. १४) सरकारवाडा पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकार कथन केल्यानंतर संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याचा माग काढत सापळा रचून मेहेर चाैकात त्यास अटक केल. दरम्यान, बुधवारीच त्यास न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

तपासात आणखी प्रकार उघडकीस येणार 
^संशयिताने पीडितेला गुंगीचे औैषध देत तिच्यावर अत्याचार केला आहे. विक्षिप्त परिस्थितीमधील फोटाे काढले आहेत. या सर्व प्रकाराचा सखोल तपास सुरू आहे. आणखी काही पीडित महिलांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. -सारिका आहिरराव, सहायक निरीक्षक 
 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या फेसबुकवर मैत्री करताना बाळगा सावधता, अत्याचाराच्या १६ घटना चार महिन्यात उघड...
बातम्या आणखी आहेत...