आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची 4 महिन्यांच्या चिमुकल्यासह आत्महत्या, सासरच्या अंगणातच अंत्यविधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड- विवाहितेने चार महिन्यांच्या चिमुकल्यासह स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील न्हनावे येथे घडली आहे. अर्चना ज्ञानेश्वर आहेर (25) असे मृत म‍हिलेचे नाव आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून अर्चनाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
 
मिळालेली माहिती अशी की, न्हनावे येथील आहेर वस्तीत राहाणारी अर्चना ज्ञानेश्वर आहेर (25) हिने चार महिन्यांचा मुलगा प्रणव याच्यासोबत शुक्रवार (5 मे) रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी  स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. यावेळी घरी कोणीच नव्हते. तिचे सासू-सासरे घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

अर्चनाने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत पती, सासू, सासरे, नणंद, नंदई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
 
संतप्त नातेवाईकांनी सासरच्या अंगणातच केला अंत्यविधी...
चांदवड येथील शासकीय रूग्णालयात अर्चना आणि प्रणव यांच्या मृतदेहाचे पोस्टमास्टम करण्यात आले. त्यानंतर दोघांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत सासरच्या अंगणातच अर्चना आणि प्रणवच्या प्रार्थिवावर अंत्यविधी केला.

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...