आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेने शिक्षिका जागीच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- डीजीपीनगररोडवरील खोडेनगर येथे गुरुवारी दुपारी एका शाळकरी वाहनाने दिलेल्या धडकेत नाशिकरोड येथील शाळेत शिक्षिका असलेल्या रंजना विश्वकर्मा शादरुल (36) या ठार झाल्या. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.

रंजना शादरुल दुपारी सपना थिएटरजवळील घराकडे परतत असताना मॅक्झिमो व्हॅन या शाळकरी वाहनाने (एमएच 15 बीसी 1261) शादरुल यांच्या स्कुटीला (एमएच 15 बीडब्ल्यू 7902) धडक दिली. यामुळे लांब फेकल्या गेलेल्या शादरुल यांना गंभीर दुखापत झाली. त्याच वाहनाने दुसर्‍या स्कुटीला धडक दिल्याने अनघा आव्हाड व आवेश आव्हाड हे मायलेक जखमी झाले आहेत. दरम्यान, व्हॅनचालक फरार झाला असून, इंदिरानगर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली.

उपमहापौर धावले मदतीला : उपमहापौर सतीश कुलकर्णी हे या रस्त्यावरून जात असता त्यांना रंजना शादरुल या रस्त्यालगत पडलेल्या दिसल्या. उपमहापौरांनी त्यांना स्वत:च्या गाडीतून जिल्हा रुग्णालयात पाहोचवले.