आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक, महिला मतदार लाख 70 हजार 699; तर पुरुष 5 लाख 2 हजार ३६

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  पुढील पाच वर्षांत नाशिकचा विकास कोण आणि कसा करणार याबाबतचा निर्णायक ठरलेल्या मतदारांच्या संख्येत पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचे नाशिक महापालिकेने मतदानाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आले आहे. त्यामुळे आता महिला मतदारांचा मतदार यादीतील वाढता टक्का प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढविणारा ठरणार आहे की नाही हे आज सिद्ध होणार आहे. 
 
मंगळवारी हाेणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत एकूण १० लाख ७३ हजार ४०७ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार लाख हजार ३६ आहेत, तर महिला मतदारांची संख्या लाख ७० हजार ६९९ आहे. त्यामुळे मतदार यादीवर तरी महिलांची संख्या अव्वल ठरली आहे, आता मतदानातील महिलांचा टक्का कितीने वाढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
महापालिकेची निवडणूक असल्याने स्थानिक रस्ते, पाणी, घंटागाडी, महापालिका शाळा आणि दवाखाने, महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे, पार्किंग, महिला मार्केट, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि नगरसेवकांशी नियमित संपर्कासाठी महिला सभा हे मुद्दे महिलांनीच प्रचारात आणले. आता त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी महिलांचे मतदानही निर्णायक ठरणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...