आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला व्हाव्या स्वयंसिद्धा; ‘निर्धार यशस्विनी होण्याचा’ कार्यशाळा उत्साहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महिलांच्या कार्यक्षमतेमध्ये वृद्धी होण्यासाठी निश्चित आणि जाणीवपूर्वक, दिशादर्शक प्रशिक्षण कार्यशाळांची गरज असून, त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता निर्माण होण्यासाठी बळ मिळत असते. त्यामुळे अशा कार्यशाळांतून महिला स्वयंसिद्धा होत असल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

यशस्विनी सामाजिक अभियानाच्या ‘निर्धार यशस्विनी होण्याचा’ या प्रशिक्षण कार्यशाळेचा सपकाळ नॉलेज हब, कल्याणी हिल्स, अंजनेरी येथील संकुलात शुभारंभ झाला. या वेळी टोपे बाोलत होते. ते पुढे म्हणाले की, दारिद्रय़रेषेखालील महिलांना बचतगट चळवळीत सामावून घेण्याची गरज आहे. त्यांना सक्षम व साक्षर करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. देश शंभर टक्केसाक्षर करण्यासाठी महिलांनी साक्षरतेची चळवळ उभारावी, त्यातून मुक्तशाळांची संकल्पना रुजवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या वेळी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या महाराष्ट्रातील तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील, सर्व समन्वयकांचे मोबाइल क्रमांक, इ-मेल याची माहिती असलेल्या अद्ययावत ‘हॅलो यशस्विनी’ सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विश्वास ठाकूर यांनी यशस्विनी अभियानाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या वेळी दत्ता सराफ, विजय कान्हेकर, शेफाली भुजबळ, कल्याणी सपकाळ, अँड. रवींद्र पगार, डॉ. अरुण मुडबिद्री, गजेंद्र मेढी, अमृता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आत्मविश्वासाची पायवाट
महिलांनी पारंपरिक त्यागी, सहनशील मानसिकता सोडून नवी आत्मविश्वासाची पायवाट शोधली आहे. स्वत:तील बदल घडविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेतून महिलांच्या कार्यक्षमतेला, कर्तृत्वाला बळ मिळेल, उमेद मिळेल. ‘यशस्विता ब्रॅण्ड’ ही महिलांच्या नव्या जगाची ओळख आहे. महिलांनी आरोग्य, विमा पॉलिसी या योजनांचा लाभ घेऊन सुरक्षितता जपावी.
-खासदार सुप्रिया सुळे, संचालक, यशस्विनी अभियान

स्त्रीमुक्तीचा कृतिशील संदेश
यशस्विनी सामाजिक अभियान ही महिलांना पारंपरिक विचारातून बाहेर पडण्यासाठी आधुनिक विचार देणारी चळवळ आहे. त्यातून स्त्रीमुक्तीचा कृतिशील संदेश प्रभावीपणे देण्यात आला आहे. महिला आपल्या प्रश्नांवर मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत. समान हक्कमिळविण्याच्या संघर्षात त्या यशस्वी ठरत आहेत.
-विनायकदादा पाटील, वनाधिपती

अभ्यास प्रयोग
‘निर्धार’ कार्यशाळा म्हणजे महिलांच्या एकत्र येण्यातून एकमेकांना समजून घेऊन नेतृत्व घडविण्यासाठी अभ्यास प्रयोग आहे. आर्थिक सबलीकरण हा महत्त्वपूर्ण भाग असलेली बचत गट चळवळ ही सामाजिक भान असलेली कृतिशील विचारयात्रा आहे. यामुळे समाज बलवान होत आहे. यात महिलांचा सहभाग महत्त्वाचाच आहे.
-हेमंत टकले, आमदार

मिळून सार्‍या जणी
महिलाक्रांती ही उंबर्‍याबाहेर पडून देश घडविण्याचा जाणिवेचा एक भाग आहे. त्यातून समाजाची मानसिकता बदलण्याचे मूलभूत आणि तितकेच कठीण काम ‘मिळून सार्‍या जणीं’नी केले आहे. हा एक नवा विचार आहे. ‘निर्धार’ प्रशिक्षण कार्यशाळा, संवाद कौशल्य हे जिद्दीने जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी प्रेरक ठरेल. दैनंदिन जीवनात महिलांना याचा नक्कीच उपयोग होईल.
-जयंत जाधव, आमदार

महिलांसाठी उत्तम प्रबोधन
आज महिलांमध्ये कार्यकर्तृत्वाला नवी प्रगतिशील जाणीव निर्माण करण्यासाठी ‘निर्धार’ कार्यशाळा चैतन्यमयी ठरणार आहे. आव्हानांचा सामना आणि स्वीकार कसा करावा, याचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन महिलांना भविष्यकालीन वाटचालीसाठी उपयुक्त ठरेल. समाजकारणात, राजकारणात काम करणार्‍या महिलांचे यातून प्रबोधन होणार आहे.
-विद्या चव्हाण, आमदार

आनंददायी, समाधानकारक
सपकाळ नॉलेजमधील ‘निर्धार’ कार्यशाळेचे आयोजन हे महिलांसाठी आनंददायी व समाधान देणारे असेच आहे. यानिमित्ताने कार्यशाळेच्या पाच दिवसांच्या कालावधीत महलांचे ‘मेडिकल कार्ड’ काढून देण्यात येणार आहे. महिलांनी याचा लाभ घ्यावा.
-रवींद्र सपकाळ