आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अाखाड्याचे स्वतंत्र ध्वजाराेहण, महंताविरुद्ध कोणतीही तकार नाही : साध्वी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘कुंभमेळ्यातील साधुग्राममधील सर्व आखाडयांचे ध्वजारोहण १९ ऑगस्टला होणार आहे. मात्र या साेहळ्याच्या एक दिवस अाधी, म्हणजेच १८ अाॅगस्टलाच अापण महिला अाखाड्याचे स्वतंत्रपणे ध्वजारोहण करणार अाहाेत,’ अशी माहिती साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी मंगळवारी दिली. या साेहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना निमंत्रित करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

साधूग्राममध्ये स्वतंत्र जागा मिळवण्यासाठी लढा देणाऱ्या साध्वी त्रिकाल भवन्ता या महंत ग्यासदास यांच्याशी झालेल्या वादामुळे देशभर चर्चेत अाल्या अाहेत. अाता त्यांना साधूग्राममध्ये प्रशासनातर्फे सेक्टर ४ मध्ये प्लॉट क्रमांक २५ व २६ ही जागा देण्यात आली. याच जागेवर आपण १८ तारखेलाच स्वतंत्रपणे ध्वजारोहण करू. सिंहस्थात महिलांना मिळालेला हा मान असून अाम्हीही या सोहळयासाठी स्वतंत्रपणे मान्यवरांना निमंत्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्यानदास यांच्याबाबत ‘यू टर्न’ :
महंत ग्यासदास यांनी विनयभंग केल्याप्रकरणी पाेलिसांत फिर्याद दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या स्वाधी यांनी अाता मात्र या मुद्द्यावर ‘यू टर्न’ घेतला. ग्यानदास महाराजांविराेधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करणार नाही. अामच्या ध्वजारोहण सोहळयासाठी त्यांनाही आमंत्रित करणार असल्याचे साध्वींनी सांगितले. दरम्यान, साध्वींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अाता कुंभमेळ्यात पुन्हा नवा वाद उद‌्भवण्याची चिन्हे अाहेत.