आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी बंद पाडले अंबड येथे बिअर शॉप, दुकानाची तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड येथील दातीरनगर परिसरातील बिअर शॉप येथे येणाऱ्या मद्यपींच्या त्रासामुळे संतप्त महिला नागरिकांनी बंद पाडले. - Divya Marathi
अंबड येथील दातीरनगर परिसरातील बिअर शॉप येथे येणाऱ्या मद्यपींच्या त्रासामुळे संतप्त महिला नागरिकांनी बंद पाडले.
सिडको- अंबड येथील दातीरनगर येथे मद्यपींच्या त्रासाला कंटाळून संतप्त झालेल्या महिला नागरिकांनी बिअर शॉप बंद पाडत त्याची तोडफोड केली. अनेक दिवसांपासून या ठिकाणी सुरू असलेले गैरप्रकार, मद्यपींचा उपद्रव यामुळे नागरिकांची सहनशक्ती संपल्याने त्यांनी थेट संपापजनक पाऊल उचलले. हे बिअर शॉप बंद झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 
 
दातीरनगर येथे रेणुका बिअर शॉप आहे. या ठिकाणी येणारे मद्यपी रस्त्यातच वाहने लावतात. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी गर्दी असते. रस्त्यातच मद्याच्या बाटल्या टाकण्याचेही प्रकार घडतात. अनेकवेळा महिला नागरिकांना येथून जाणे त्रासदायक ठरते. मद्यपींमध्ये अनेक वाद सुरू असतात. त्यांच्यात शिवीगाळ होते. या सर्व त्रासाला कंटाळून मंगळवारी रात्री परिसरातील महिला सर्व नागरिकांनी एकत्र येत थेट रेणुका बिअर शॉपच बंद पाडले. सांगूनही ऐकत नसल्याने महिलांनी थेट तोडफोडीचा मार्ग अवलंबला. महिलांच्या रुद्रावतारापुढे बिअर शॉपचालकाची चांगलीच तारांबळ झाली. नेहमीच रुबाबात राहणारे शॉपचालक नागरिकांपुढे हतबल झाले. याबाबत माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. 
 
प्रशासनाने दखल घेतल्यास अांदोलन 
-हे बिअर शॉप सर्व नागरिकास प्रचंड त्रासदायक ठरत आहे. महिलांना येथून येणे जाणे जिकरीचे झाले आहे. बंद करण्याची मागणी करूनही प्रशासन दखल घेईना. यापुढे हे शॉप बंद झाल्यास आंदोलन उभे करू. -रामदास दातीर, सामाजिक कार्यकर्ते. 
बातम्या आणखी आहेत...