आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल चॅलेंज: महिला अत्याचाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी केला जागर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कौटुंबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, अनुसूचित जाती-जमाती महिलांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या- एक विदारक सत्य अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण विवेचन सादर करत आयएमआरटी कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे विद्यार्थ्यांनी बुधवारी महिला अत्याचाराविरुद्ध जागर केला. निमित्त होते, कॉलेजतर्फे आयोजित सोशल चॅलेंज-2013 उपक्रमाचे!

मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आपल्या आयुष्यात आलेली आव्हाने आणि आपण त्यावर केलेली मात या विषयीच्या आठवणींना पवार यांनी या वेळी उजाळा दिला. परीक्षक म्हणून एनबीटी लॉ कॉलेजच्या प्रा. डॉ. मेधा सायखेडकर, केटीएचएम कॉलेजचे प्रा. संजय सावळे उपस्थित होते. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘महिलांचे शोषण’ या विषयावर विविध मुद्यांनी प्रकाश टाकला. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या वेळी केलेल्या विवेचनाने समाजातील सद्यस्थिती उलगडली. आर्कि. अमृता पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. समन्वयक प्रा. घनश्याम जगताप होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य विलास देशमुख, प्राध्यापक, कर्मचार्‍यांनी पर्शिम घेतले. तृप्ती बैरागी, अजित भालके, पूजा जवराज, सविता भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. भारती बागुल यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांनी हाताळलेले विषय
0 कौटुंबिक हिंसाचार : एक सामाजिक समस्या शीतल महाजन, दीपाली चौधरी, स्वाती देसले, समाधान आहेर
0 कामाच्या ठिकाणची छळवणूक : विशाखा कायदा सविता भोंडवे, वैशाली फुलपगारे, ज्योती सूर्यवंशी
0 स्त्रीभ्रूण हत्या : एक विदारक सत्य चंदा थेटे, मधुमिता दास, अर्पणा धाकराव, पूनम भदाणे
0 महिला अत्याचार रोखण्यात महिलांची भूमिका विजय मोरे
0 अनुसूचित जाती : जमाती महिलांवरील अत्याचार - सामाजिक प्रश्न योगेश तारडे, प्रमोद वारूंगसे
0 स्त्री-पुरुष समानता दृष्टिकोन किती शक्य, किती अशक्य उषा शेलार, मृणाल जगदाळे