आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा रुद्रावतार; सिडकाेत मद्यविक्रीचे दुकान फाेडले तर सातपूरला फाेडल्या दुकानातील मद्य बाटल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडकोतील महाकाली चौक दत्त चौक येथील देशी दारु दुकानांच्या विरोधात संतप्त महिलानी आक्रमक होत या दुकानाची तोडफोड केली. मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी बुधवारी रणरागिनीचे रुप धारण केले. प्रशासन दुकान बंद करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने महिलांनीच दुकानाला कुलूप लावले. 
 
मागील आठवाड्यातच या ठिकाणी काही मद्यपींनी महिलांची छेडछाड काढली होती. यामुळे संतप्त महिलांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बोलावून महाकाली चौकातील देशी दारू दुकानासमोर मद्यपींना चाेप दिला हाेता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना हे दुकान बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र कार्यवाही झाल्याने महिलांनी हे दुकान फोडले. घटनेनंतर अंबड पोलिस घटनास्थळी दाखल हाेत आंदोलकांना ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना निवेदन दिले. यावेळी अंकुश वराडे, विनायक शिंदे, रुपचंद केदारे आदिसंह नागरिक उपस्थित होते. 
 
‘उत्पादन शुल्क’ची कारवाई, ६२ मद्य बाॅक्स जप्त 
सातपूर - आठदिवसाचा अल्टीमेटम देवुनही अशोकनगर येथील नाशिक ब्रँडी हे दारु दुकान हटविल्याने बुधवारी (दि. २६) सायंकाळी परिसरातील संतप्त महिलांनी दारु दुकानातील देशी-विदेशी दारुच्या बाटल्या फोडत संताप व्यक्त केला. दरम्यान, याच दारु दुकानातील मद्यसाठा विनापरवानगी इतरत्र घेवुन जाणाऱ्या ओमनी व्हॅनसह देशी विदेशी मद्याचे ६२ बाॅक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या अातील सर्व दारु दुकाने बिअर बार बंद करण्यात आले आहे. यामुळे अशोकनगर येथील नाशिक ब्रॅण्डी या दुकानावर मद्य खरेदीसाठी माेठी गर्दी हाेत अाहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मद्यपींचा त्रास हाेत असल्याने महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. आठ दिवसात दुकान इतरत्र हरहलविण्याची मागणी परिसरातील महिलानी केली होती. 

संतप्त प्रतिक्रिया 
^महाकाली दत्तचौक येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, मात्र कारवाई झाली नाही. आजचे आंदोलन ही महिलांची संतप्त प्रतिक्रिया आहे. -मुकेश शहाणे, नगरसेवक. 

 
 
बातम्या आणखी आहेत...