आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Womens Movment Agrisive Nashik Work Places Molistration

लैंगिक छळाविरोधात आवाज उठवावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्यास या विरोधात महिलांनी संघटित होत आवाज उठवण्याची गरज एसएमआरके महाविद्यालयातर्फे आयोजित परिसंवादात विविध वक्त्यांनी व्यक्त केली.
‘कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ’ या विषयावरील एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. स्त्रियांविषयीच्या महत्त्वाच्या कायद्यांची माहिती महाराष्टÑ व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी याप्रसंगी दिली. महिलांनी संघटित होत छळाविरोधात आवाज उठवण्याची गरज टाटा इन्स्टिट्यूटच्या प्रा. छाया दातार यांनी व्यक्त केली. परिसंवादात पाच सत्रांमध्ये विविध विषयांवर मंथन झाले. यात विविध विषयांचा समावेश होता. नारी समता मंचच्या डॉ. अंजली मायदेव, प्रा. एम. पी. राणे, मासूम संस्थेच्या अर्चना मोरे, अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, अ‍ॅड. मीलन कोहर, अभिव्यक्ती संस्थेच्या सुजाता बाबर, वात्सल्य संस्थेच्या नलिनी पाटील, अ‍ॅड. अस्मिता वैद्य, माजी आमदार निशिगंधा मोगल आदी मान्यवर परिसंवादात सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. गीता यादव यांच्या ‘रामदरश मिश्र के उपन्यासों में सांस्कृतिक चेतना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदा गोसावी यांचादेखील अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपप्राचार्या साधना देशमुख यांनी केले. स्वागत व परिचय प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी केले. आभार डॉ. निखिला भागवत यांनी मानले. सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी मुग्धा जोशी व प्राची घाटे यांनी केले. व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो.स. गोसावी, प्राचार्या सुनंदा गोसावी यांची उपस्थिती होती.