आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा रुद्रावतार; मद्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकत केला वाइन शॉपला विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नवीन तिडके कॉलनीतील रहिवासी इमारतीत वाइन शॉप सुरू करण्यासाठी शाॅपचालकाने सोमवारी (दि. १०) थेट दोन ट्रक भरून देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या अाणल्या. मात्र, परिसरातील महिलांसह नागरिकांनी या शाॅपला विरोध दर्शवत थेट रस्त्यावर मद्याच्या बाटल्या फेकल्या. महिलांचा रुद्रावतार बघत शेवटी वाइन शॉपचालकास आणलेला माल परत नेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. त्यानंतर त्याने हा माल परत नेला.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पेठरोड परिसरातील तरुण सुखवाणी यांचे बंद झालेले हिरा वाइन्स हे वाइन शॉप नवीन तिडके कॉलनीतील लंबोदर अॅव्हेन्यू या इमारतीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका गाळ्यामध्ये सुरू करण्यात येणार होते. मात्र, परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी वाइन शॉप सुरू करण्यास विरोध केला. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे रहिवाशांनी निवेदनही दिले हाेते. गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू असताना सोमवारी दुपारी सुखवाणी यांनी वाइन शॉप सुरू करण्यासाठी थेट दोन ट्रक भरून देशी-विदेशी मद्याचे बॉक्स आणत गाळ्यामध्ये ठेवण्यात सुरुवात केली. यास विरोध करत महिलांनी या गाळ्यात घुसून मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स उर्वरितपान 

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध कायम 
याठिकाणी वाइन शॉपला परवानगी देऊ नये यासाठी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन वेळा निवेदन दिले होते. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यलयात परिसरातील नागरिक वाइन शॉपचालक यांच्यात झालेल्या बैठकीत माल गाळ्यात उतरवू द्यावा पाेलिसांनी हा गाळा सील करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, नागरिकांनी यास विरोध करत मद्याच्या बाटल्या गाळ्यात ठेवण्यास नकार देत थेट रस्त्यावर मद्याच्या बाटल्या फेकल्या. 

खासगी सुरक्षारक्षक महिलांची दमदाटी 
या ठिकाणी वाइन शाॅप सुरू करण्यासाठी महिलांचा होणारा विराेध लक्षात घेत वाइन शॉपचालकाने सोमवारी थेट एका खासगी एजन्सीच्या महिला सुरक्षारक्षकांच्या बंदोबस्तात मद्याच्या माल उतरण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या सुरक्षारक्षकांनी पोलिसांच्या गणवेशासाख्या खाकी रंगाच्या साड्या परिधान करत या परिसरातील महिलांना दमदाटी केल्याची तक्रार नागरिकांनी केली. 

वाइनशॉपसुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेत गाळ्यात माल उतरविण्यात यावा पुढील निर्णय होईपर्यंत पोलिसांनी गाळा सील करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हाेतीे. मात्र, महिलांनी थेट मद्याचे बॉक्स रस्त्यावर फेकल्याने ते लाख रुपयांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? 
- तरुण सुखवाणी, वाइन शॉपचालक 
बातम्या आणखी आहेत...