आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकरोड- महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी नाशिकच्या तीन तरुणांनी ‘मी अगेन्स्ट रेप’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरची पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्यासह ज्येष्ठ अधिकार्यांनी स्तुती केली. महिलांनी सुरक्षिततेसाठी हे सॉफ्टवेअर वापरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दिल्लीत तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने व्यथित झाल्याने मोबाइल अँप्लिकेशन तयार करणार्या नाशकातील गुणवंत बत्ताशे (वय 23, अँन्ड्रॉईड सॉफ्टवेअर डेव्हलपर) अनुप उन्नीकृष्णन (वय 24) व जयेश बनकर (वय 23, ग्राफिक्स डिझायनर) या तरुण इंजिनिअर्सच्या मनात समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा जागृत झाली. माता-भगिनींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी लागलीच त्यावर काम करण्यास सुरुवात केली. आठवडाभराच्या पर्शिमानंतर ते त्यांच्या कार्यात यशस्वी झाले.
मी अगेनस्ट रेप : दोन आठवड्यात तयार केलेल्या ‘मी अगेन्स्ट रेप’ हे सॉफ्टवेअर महिलांवर आलेल्या संकटाची पोलिस, आप्तस्वकियांना तात्काळ धोक्याची सूचना देईल.
काय आहे सॉफ्टवेअरमध्ये : महिलांच्या सुरक्षेसाठी वन टच हेल्पलाइन, टिप्स, घटनास्थळाच्या घटनेची वन टच रेकॉर्डिंग, प्रत्येक दहा मिनिटाला करंट लोकेशन तसेच हेल्प बटन दाबल्यावर मदतनिसास कॉल, एसएमएसही पाठविला जातो. त्यात ‘आय एम ट्रबल’ असा आशय असून, त्याबरोबरच घटनास्थळाचा पत्ता, गुगल नकाशाची लिंक, वेळ याशिवाय प्रबोधनासाठी घोषवाक्यांचा यात समावेश आहे.
पोलिस आयुक्तांसमोर प्रात्यक्षिक
‘मी अगेन्स्ट रेप’ या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या समोर झाले. सॉफ्टवेअरची आयुक्तांनी प्रशंसा करत त्यावरून त्यांनी ‘एक्सलंट अँप्लिकेशन, मस्ट युज ईट’ असा संदेश दिला. मुंबई पोलिसांनी विकसित केलेल्या सॉफ्टवेअरपेक्षा महिलांच्या सुरक्षेसंदर्भात यात दोन गोष्टी अधिक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. प्रात्यक्षिकप्रसंगी उपायुक्त साहेबराव पाटील, डॉ. स्वामी, संदीप दिवाण, नंदकुमार चौगुले, हेमराज रजपूत, गणेश शिंदे, प्रकाश सौंदाणे, संजीव ठाकूर उपस्थित होते.
सॉफ्टवेअर मोफत देणार
हे सॉफ्टवेअर मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या तरुणांनी घेतला आहे. इच्छुक महिलांना https://play.google.com/store/apps/details?id=com.nebulastudios.meagainstrape या लिंकवर जाऊन सॉफ्टवेअर अँन्ड्रॉईड मोबाइल हॅण्डसेटवर डाउनलोड करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.