आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग 8 मध्ये शिवसेनेसमाेर भाजपचे अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनेला जाेरदार टक्कर देण्यासाठी प्रभाग क्रमांक मध्ये भाजपने कंबर कसली अाहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे नातेसंबंध असलेले उमेदवार अाता एकमेकांसमाेर उभे ठाकणार अाहेत. काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला अाता उमेदवारांचा शाेध घ्यावा लागेल, अशी स्थिती अाहे.
नरसिंहनगर, शंकरनगर, सद््गुरूनगर, खांदवेनगर, साेमेश्वर काॅलनी, भवर मळा, संत कबीरनगर, काळेनगर, सावरकरनगर, अानंदवली परिसर, अानंदवली गाव, गंगापूर गाव या परिसराचा समावेश या प्रभागात अाहे. या प्रभागात मराठा, माळी, मागासवर्गीय अाणि अादिवासी समाजाचे प्राबल्य अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागाची लाेकसंख्या ४४ हजार ४०१ इतकी असून, त्यात अनुसूचित जाती संवर्गातील हजार २६५, तर अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील हजार २६० इतकी लाेकसंख्या अाहे. याशिवाय, प्रभागात उत्तर भारतीयांचे मतदानदेखील बऱ्यापैकी अाहे.

तीनप्रभागांचा झाला एक प्रभाग : सध्याचाप्रभाग क्रमांक १५ चा काही भाग, प्रभाग १६ २१ चा काही भाग असा मिळून नवीन रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक ची निर्मिती झाली अाहे. या प्रभागाचे सध्या विलास शिंदे, रेखा बेंडकुळे, विक्रांत मते अाणि उषा अाहिरे, अामदार सीमा हिरे, अामदार राहुल अाहेर हे प्रतिनिधित्व करतात.

शिवसेना अाणि भाजपच्या लाटेमुळे सध्या याच पक्षांचे उमेदवार प्रबळ असल्याचे जाणवत अाहे. शिवसेनेच्या वतीने विद्यमान नगरसेवक विलास शिंदे, गेल्या वेळी अपक्ष असतानाही ताेडीची लढत देणारे संताेष गायकवाड, विष्णुपंत बेंडकुळे यांची पत्नी राधा बेंडकुळे, दीपाली सागर काेथमिरे, भरत गांगुर्डे, महेंद्र शिंदे, माेहिते, पवार अशी नावे चर्चेत अाहेत. तर, भाजपकडून दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमाेल, काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेशित झालेल्या माजी नगरसेविका उषा बेंडकुळे, सातपूर ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करणारे अशाेक जाधव, नारायण जाधव, शहर महिलाध्यक्ष राेहिणी नायडू, माजी अामदार दत्तात्रय काळे यांची मुलगी रेखा दाणी यांची नावे चर्चेत अाहेत. माजी महापाैर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम हे काेणत्या पक्षाकडून निवडणूक लढवितात हे बघणेदेखील अाैत्सुक्याचे ठरणार अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत मते तसेच नगरसेविका उषा अाहेर वा त्यांची नात निवडणुकीत उमेदवार असू शकतात. गेल्या वेळी मते यांना ‘टफ फाइट’ देणारे संदीप काळे, सचिन मंडलिक, अरुण काळे, मनीषा लासुरे हेदेखील प्रमुख दावेदार असतील. एसटी संवर्गाच्या जागेसाठी अाघाडीला माेठी शाेधाशाेध करावी लागणार अाहे. दुसरीकडे मनसेकडे तूर्तास रेखा बेंडकुळे यांच्याशिवाय फारसा प्रबळ उमेदवार असल्याचे सध्यातरी दिसत नाही.

रिश्ताे की लडाई
याप्रभागात अमाेल अाणि प्रेम पाटील हे चुलतभाऊ निवडणूक लढविण्याची तयारी करीत अाहेत. यात दाेघांनी भाजपकडून दावा केल्यास यातील एकजण थांबून घेऊ शकताे. नगरसेवक विलास शिंदे हे देखील पाटील परिवाराच्या निकटवर्तीय नातेसंबंधातील अाहे. दुसरीकडे संताेष गायकवाड, अशाेक जाधव, नारायण जाधव हे एकमेकांचे नातेवाईक अाहेत. अनुसूचित जमाती संवर्गातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उषा, राधा अाणि रेखा बेंडकुळे या एकमेकींच्या जावा अाहेत.
बातम्या आणखी आहेत...