आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन प्रभागरचना; अाधी अाैत्सुक्य, हुरहुर, नंतर अाशा-निराशेचा खेळ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नकाशांवर फिरणाऱ्या शाेधक नजरा... अापल्या प्रभाव क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्याविषयी झडणाऱ्या चर्चा... राजकीय अंदाजांच्या फैरी... महत्त्वाचे भाग प्रभागातून वगळले गेल्याने खट्टू झालेले नगरसेवक असे चित्र महाकवी कालिदास कलामंदिराबाहेर असताना कलामंदिरातील अारक्षण साेडतीच्या वेळी कमालीची उत्सुकता अाणि हुरहुर अशा संमिश्र भावना शुक्रवारी (दि. ७) बघायला मिळाल्या. अारक्षण पडल्यास इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांमधून उत्स्फूर्तपणे टाळ्यांची दाद मिळत हाेती; मात्र अन्य अारक्षणामुळे अापला पत्ता कट झाल्याची भावना हाेताच काही मंडळींनी तातडीने सभागृहाबाहेरचा रस्ताही धरला.
कालिदास कलामंदिरात अारक्षण साेडत जाहीर हाेण्यापूर्वीच प्रभागरचनेचे नकाशे सभागृहाबाहेर महापालिकेने लावले हाेते. त्यामुळे सकाळी वाजेपासूनच गर्दी सुरू झाली. अापल्या प्रभागात नक्की काेणते अारक्षण पडणार, अनुरूप प्रभाग राहणार की नाही, अारक्षण मनाजाेगते पडले नाही तर काय करायचे, अशा अनेक शंका-कुशंकांचे काहूर मनात घेऊनच शेकडाे ‘इच्छुक’ कालिदासच्या सभाेवती सकाळी १० पासूनच घिरट्या घालत हाेते. अखेरीस दुपारपर्यंत सारे चित्र स्पष्ट झाल्यानंतर काही चेहऱ्यावर अानंदाचा भाव घेऊन, तर काही जण ‘अाता नक्की काय करायचे?’ असे चिंतातुर हाेऊन बाहेर पडले. अारक्षण साेडतीप्रसंगी कालिदास कलामंदिरातील चित्रही संमिश्र भावनांनी भारलेले असेच हाेते. अनुसूचित जाती संवर्गातील अारक्षणे जाहीर हाेताच उपस्थितांपैकी अनेकांनी सभागृह साेडले. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठीच्या अारक्षणांची साेडत काढण्यात अाली.

प्रभाग जाहीर हाेताच बदलू लागले चेहऱ्यावरील भाव...
प्रक्रिया सुरू असतानाच कालिदासबाजूच्या प्रांगणात तसेच भालेकर मैदानावर भव्य स्क्रिनसमाेर बसून शेकडाे इच्छुक अारक्षणाची उत्सुकता अन‌् प्रभागातील समीकरणांची मांडणी जुळवू लागले. काही इच्छुकांचे बंधू, कुणाचे डावे-उजवे गर्दी करीत हाेते. जसजसा प्रभाग जाहीर हाेऊ लागला तसतशी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले.
बातम्या आणखी आहेत...