आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिठ्ठ्या काढल्या, कुठल्या तरी अंकांच्या..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘अाम्हीना चिठ्ठ्या काढल्या, विभागाच्या का अंकांच्या हाेत्या, १२ अ, २० ब... असे काही तरी हाेते.. काय हाेते, नक्की नाही माहीत... कुठल्या तरी निवडणुकीच्या हाेत्या...’ नाशिकच्या संभाव्य १२२ नगरसेवकांचे भवितव्य ज्या अबाेध हातांनी चिठ्ठ्यांमधून काढले, त्या मुलांच्या या तितक्याच निरागस प्रतिक्रिया...
बालकांच्या हातून लाॅटरीद्वारे प्रभाग अारक्षणांचे लाॅट निघाले. यानंतर ती मुले कालिदासमधून बाहेर पडताना त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांनी किती महत्त्वाचे काम केले अाहे, याची गंधवार्ताही त्यांना नसल्याचे दिसून अाले. मखमलाबाद नाक्यावरील शाळा क्र. २९ मधील पाचवी ते सातवीतील मुलांनी या चिठ्ठ्या काढल्या. यानंतर अत्यंत सहजपणे या बालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांना अापण या चिठ्ठ्या कसल्या काढत अाहाेत, ते माहितीच नव्हते. ‘कसली तरी निवडणूक’ इतक्याच शब्दात ते या प्रक्रियेचे विश्लेषण करू शकले. पण, इतक्या माेठ्या लाेकांसमाेर चिठ्ठ्या काढताना कसे वाटले, म्हटल्यावर ‘खूप मस्त...’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या.

बातम्या आणखी आहेत...