आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांच्या पाचशे फायलींचा मार्ग बंद, ‘डीएसअार’बदलाचा फटका;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा बांधकाम दरसूची अर्थातच ‘डीएसअार’मध्ये झालेल्या बदलामुळे नगरसेवक निधीतील जुन्या फायलींच्या मंजुरीला ब्रेक लागणार असून, त्याचा फटका जवळपास पाचशे फायलींना बसल्याचे वृत्त अाहे. नवीन दरसूचीप्रमाणे फायली मंजूर करण्यात कालापव्यय हाेणार असल्यामुळे एकूणच प्रक्रिया प्रशासनाच्या पथ्यावर पडणार अाहे.
अाधीच महापालिकेची परिस्थिती नाजूक असताना त्यातच नगरसेवकांकडून विकासकामांसाठी अाग्रह धरला जात अाहे. मध्यंतरी अाठ महिने अायुक्त नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या तसेच चालू वर्षाच्या अंदाजपत्रकातील अनेक किरकाेळ कामांच्या फाईली मंजूर झालेल्या नाहीत. यातील काही फायलींना प्रभाग समितीवर मंजुरी िमळाली अाहे. मात्र निविदा प्रक्रिया कार्यारंभ अादेश देणे बाकी अाहेत. अशा फायलींची अंदाजपत्रके अाता जुन्या बांधकाम दर सूचीप्रमाणे केली असल्यामुळे ठेकेदार कमी दरात कामे करण्यास तयार हाेणार नाहीत अशीही अडचण अाहे. त्यामुळे या फायलींना सुधारित दराप्रमाणे सादर करण्याचे अभिप्राय िदले जात असल्याचे समजते.
फायलींच्या मंजुरीचा प्रवास लांबलचक असल्यामुळे त्यात अायुक्तांनी निधी उपलब्धता गरज याप्रमाणे मंजुरीचे धाेरण स्वीकारल्यामुळे या विकासकामांना तूर्तास पूर्णपणे ब्रेक लागेल, असे दिसते.
दरम्यान, काही नगरसेवकांनी खासगीत त्यावर हरकत घेत, निविदा मंजूर करताना दहा टक्के जादा दर गृहित धरला तर डीएसअारमधील वाढ भरून निघेल असे मत व्यक्त केले. नगरसेवकांच्या कामांना ब्रेक लावण्यासाठी प्रशासनाकडून असे धाेरण स्वीकारले जात असल्याचेही सांगितले जाते.