आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमारतीवरून पडून कामगार ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बिंद्रेश हरिश्चंद्र कुशवाह (वय 28, रा. औरंगाबादनाका) हा कामगार ठार झाला.

जुना आडगाव नाका भागातील हल्दी लॉन्स येथील दीप्ती कन्स्ट्रक्शनच्या नवीन इमारतीमध्ये दुसर्‍या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन पडल्याने बिंद्रेश हा गंभीर जखमी झाला. महेंद्रभाई पटेल यांनी त्यास आडगाव येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, जवळच खासगी दवाखाने असूनही वेळेत उपचार न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.