आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ यांच्या अटकेचे जिल्ह्यात पडसाद, महामार्गावर जाळपाेळीच्या घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादीच्या कार्यालयासमाेरील उड्डाणपुलावर टायर जाळण्यात अाले. - Divya Marathi
राष्ट्रवादीच्या कार्यालयासमाेरील उड्डाणपुलावर टायर जाळण्यात अाले.
नाशिक/येवला/लासलगाव - सक्त वसुली संचालनालयाने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना साेमवारी अटक केल्याने जिल्हाभरात त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात बंदची हाक देण्यात अाली. महामार्गावर रास्ता राेकाे अांदाेलन करण्यात अाले. पाळण्यात अालेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नाशकातील मुख्य चौकात अचानक रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी खासदार किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

मंगळवारी सकाळपासूनच माजी सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ यांच्या अटकेचे नाशकात पडसाद उमटले. ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणा देत रस्त्यावर उतरले. सीबीएस परिसरातील न्यायालयाच्या बाहेर राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा मगर, सुनीता निमसे, छबू नागरे, प्रिया शर्मा, संजय खैरनार, वैभव खैरे, देवांग जानी यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला. पाेलिसांनी १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबई नाका परिसरात भाजपचे खासदार किरीट सोमय्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. १२ वाजेच्या सुमारास द्वारका परिसरात नगरसेविका रंजना पवार, नाना पवार यांच्या उपस्थितीत टायर जाळून रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी रामा गायकवाड, आसिफ जानोरी, धर्मराज काथवटे उपस्थित होते. काही कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावर राष्ट्रवादी भवनसमोर टायर जाळून वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी ३२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. येवल्यात सकाळी १० वाजता भुजबळ संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली हाेती. अाठवडे बाजार असताना बाजार समितीच्या अावारात व्यापाऱ्यांनी भाजीपाला लिलाव हाेऊ दिले नाही. प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढण्यात अाली. अंदरसूल, नगरसूल, पाटाेदा राजापूर येथे बंद पाळण्यात अाला. सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, विद्यार्थी काँग्रेसतर्फे िवंचूर-प्रकाशा मार्गावर अांदाेलन छेडण्यात अाले. मनमाड येथे समर्थकांनी घाेषणा देत शिर्डी मार्गावर रास्ता राेकाे केला. नांदगावमध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात अाले. चांदवड येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. इगतपुरीत मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता राेकाे करण्यात अाला. याप्रसंगी तहसीलदार महेंद्र पवार यांना कार्यकर्त्यांतर्फे निवेदन देण्यात अाले.

पुढे वाचा.. अन‌् अागंतुक दिसेनासा झाला