आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाकरिता कामगारांना कुठे सुटी तर कुठे दाेन तासांची सवलत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अाणि जिल्हा परिषद व पंचायत समितकरिताची पंचवार्षिक निवडणूक मंगळवारी (दि. २१) हाेत अाहे. या दिवशी मतदानाकरिता वेळ मिळावा याकरिता उद्याेग, अास्थापना यांना एक दिवसाची भरपगारी सुटी देण्यात यावी, असे अादेश कामगार उपायुक्तांनी दिले असल्याने बहुतांश उद्याेग मंगळवारी बंद राहाणार अाहेत. 
 
निरंतर प्रक्रिया प्रकारात माेडणाऱ्या शहरातील उद्याेगांनी त्यांच्या कामगारांना मतदानाकरिता काही तासांचा वेळ मतदानाकरिता उपलब्ध करून देण्यात अाला अाहे.
 
शाळा, महाविद्यालयांनाहीसुटी असेल. दुकानांसारख्या खासगी अास्थापना, माॅल्स यांनाही कामगारांना मतदानाकरिता भरपगारी सुटी देण्याचे अादेश अाहेत. नाशिक जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्या तसेच महापालिका यांच्याकरिता मंगळवारी हाेणाऱ्या निवडणुकीत कामगार, कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे याकरिता दुकाने, अास्थापना, निवासी हाॅटेल्स, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, अाैद्याेगिक उपक्रम किंवा इतर अास्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शाॅपिंग माॅल्स, रिटेलर्स यांकडे कार्यरत असलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी सुटी अथवा दाेन तासांची सवलत देण्याबाबत स्पष्ट केले अाहे. 

याच अनुषंगाने नाशिकचे कामगार उपायुक्त जी. जी. दाभाडे यांनी परिपत्रक काढून उद्याेग, विविध प्रकारच्या अास्थापना यांना एक दिवसाची सुटी देण्याचे अावाहन केले अाहे. ज्याला अनेकांनी प्रतिसाद दिला असून, काही उद्याेगांनी बाहेरगावच्या कामगारांना पूर्ण दिवसाची सुटी, तर पहिल्या पाळीच्या कामगारांना दाेन तास लवकर साेडणे तर जनरल शिफ्टच्या कामगारांना दाेन तास उशिरा येण्याची सवलत दिली अाहे, यामुळे प्रत्येक कामगाराला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले. 
 
यांना दाेन तासांची सवलत : कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धाेका अथवा माेठ्या प्रमाणात नुकसान हाेईल अशा अास्थापना किंवा उद्याेगांतील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम किंवा अखंडित उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाेन तासांची सवलत देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात अाले अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...