आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानासाठी कंपनी कामगारांना पगारी सुटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मतदानाचाहक्क बजावता यावा, यासाठी सर्वच कंपनी कामगारांसह इतर आस्थापनांच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ पगारी सुटी दिली जाणार आहे. सुटी घेऊनही मतदान करणा-यांवर कारवाई केली जाणार असल्याचे, कामगार उपायुक्त रा. सु. जाधव यांनी सांगितले.
कंपनी कामगारांना मतदानाच्या दिवशी सुटी द्यायची की नाही, यावरून कामगार मालक यांच्यात मतभेद होते. मतदानासाठी सुटी मिळावी म्हणून कामगार संघटनांनी कामगार आयुक्तांकडे मागणी केली होती. त्यानुसार कामगार आयुक्त आर. ए. जाधव यांनी निमा, आयमा संघटनेच्या पदाधिका-यांची सोमवारी बैठक घेऊन कामगारांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी देण्याचे आदेश दिले. तर, ज्या कंपन्या बंद ठेवण्यास अडचणी असतील, तेथील कामगारांना दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ मतदानासाठी सुटी देण्यात येणार असल्याचे या वेळी निश्चित झाले. मतदानासाठी सुटी घेणाऱ्या कामगारांनी मतदान केले नसल्यास कायदेशीर कारवाई करण्याची सूचना उपायुक्त जाधव यांनी दिली आहे.