आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीवर नियंत्रण आणणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य करण्यासाठी पालिस दलात नवनियुक्त 200हून अधिक पुरुष-महिला कर्मचार्यांना शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) धर्तीवर कमांडो प्रशिक्षण देण्याचा पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरगंल यांनी निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील 60 कर्मचार्यांच्या प्रशिक्षणास मंगळवारी प्रारंभ झाला.
उपआयुक्त नंदकुमार चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील कवायत मैदानावर दोन महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस दलात नव्यानेच दाखल झालेले आणि तरुण पुरुष-महिला कर्मचार्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रशिक्षणाबाबत कोणावरही सक्ती केली जात नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रशिक्षणात पूरस्थिती, आग अथवा अनुचित घटना घडल्यास या कर्मचार्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करता येईल, या दिशेने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये 15 किलोमीटर अंतरापर्यंत धावणे, ट्रेकिंग आणि स्वसंरक्षणार्थ कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी सोलापूर अकादमीत पाठविले जाणार आहे.
कामाबरोबरच प्रशिक्षण
पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार सिंहस्थासाठी टप्प्याटप्याने सुमारे 200 ते 250 कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कर्मचार्यांची सिंहस्थ पर्वणीच्या काळात महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. या कर्मचार्यांना नियमित कामकाजाबरोबर सकाळी आणि सायंकाळी जादा तास प्रशिक्षण दिले जाणार आहे. नंदकुमार चौघुले, पोलिस उपआयुक्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.