आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग, अाकर्षक कलाकृतीतून करून दिली लिपीची अाेळख, मुलांसह पालकांनी अनुभवली कुंचल्याची जादू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धर्म, भाषा, संस्कृती अशा विविधतेने एकता असलेल्या भारतात या सर्व संस्कृतीला मिलाफ अनुभवायला मिळतो. विशेषत: भारतीय संस्कृतीमध्ये लिपीचे एक वेगळेच महत्त्व आहे. या लिपी आणि रंगांच्या माध्यमातून रंगलेला मिलाफ ‘दिव्य मराठी’च्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये अनुभवायला मिळाला. स्नेहल एकबोटे यांच्या ‘मिलाफ शब्द आणि रंगांचा’ या कार्यशाळेमध्ये विविध भारतीय लिपी आणि रंग यांची सांगड घालून कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृती शिकायला मिळाल्या.
 
कार्यशाळेमध्ये स्नेहल एकबोटे यांनी आधुनिक शारदा, टाकरी आणि गुरुमुखी यासह विविध भारतीय प्राचीन लिपीची ओळख रंगाचा वापर करून तयार केलेल्या अाकर्षक कलाकृतीद्वारे करून दिली. लिपीतील काही स्वर आणि व्यंजन यांचा वापर नक्षीदार उपयोग करत इतिहासात जमा झालेल्या नव्याने अलंकारिक स्वरूपात यावेळी उपस्थित रसिकांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे सादर करण्यात आल्या. तसेच या कार्यशाळेच्या माध्यामातून या लिपी रंगाचा उपयोग करून विविध कपडे, साहित्य, वस्तूवर सहज साकारता येतील अशा कलाकृतीबाबत एकबोटे यांनी मार्गदर्शन केले.
 
चिमुकल्यांसह पालकांनी रेखाटले लिपीतील विविध अक्षरे
कार्यशाळेदरम्यान उपस्थित चिमुकल्यांसह पालकांनी विविध लिपीतील अक्षरांचा उपयोग करून विविध डिझाइन साकारली. रंग शब्दाचा उपयोग करून कुंचल्यातून साकारलेल्या लिपीचा अनोखा अनुभवदेखील उपस्थितांनी घेतला.
बातम्या आणखी आहेत...