आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिक्षणातून शांतता’ विषयावर नाशिकमध्ये जागतिक परिषद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षण हे शांतता प्रस्थापित करण्याचे सगळ्यात महत्त्वाचे माध्यम आहे. मुळात देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाचाच मुख्यत्वे उपयोग व्हायला हवा, या उद्देशाने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिषद घेतली जाणार आहे. भारतामध्ये तिसरी आणि महाराष्ट्रातील या प्रकारची ही पहिलीच शैक्षणिक परिषद २४, २५ २६ अाॅक्टाेबरला हाेत आहे.
नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एसएमआरके महिला महाविद्यालयाला यंदा या परिषदेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. परिषदेत जगभरातून हजारो अभ्यासक सहभागी होणार आहेत. संस्थेचे २०० विद्यार्थी २५ तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने या परिषदेचे आयोजन केले जात आहे. यामध्ये तीन दिवशी विविध अभ्यासकांची व्याख्याने, कार्यशाळा आणि कार्यक्रम होतील. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शंभर वर्षांतील पदार्पणापूर्वीचे हे २५ महिने संस्थेमध्ये विविध शाश्वत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याची औपचारिक सुरुवात या कार्यक्रमाने होईल. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या १५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभ्यासाचा विषय विश्वशांती हा या परिषदेच्या अभ्यासाचा मुद्दा असणार आहे. परिषदेच्या उद‌्घाटन साेहळ्यास राज्यपाल डाॅ. सी. विद्यासागर राव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार अाहेत.

या सोहळ्याची सांगता सर डॉ. एम. एस. गोसावी यांच्या सत्काराने होईल, अशी माहिती ‘दिव्य मराठी’शी बोलताना संस्थेच्या विभागीय सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांनी दिली.

५२ संशाेधनांचे सादरीकरण
या परिषदेमध्ये शांततेचा प्रसार आणि प्रबोधन शिक्षणातून व्हावे, यासाठी या परिषदेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. परिषदेत तीन दिवसांमध्ये ५२ वेगवेगळ्या स्तरांतून करण्यात आलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन्स आणि भारतामध्ये जागतिक शांततेवर अभ्यास आणि काम करणाऱ्यांची व्याख्याने होणार आहेत.

विश्वशांतीसाठी काम उभे करण्याचा मानस
^शिक्षणासारखे प्रभावी माध्यम वापरून शांतता, सुरक्षितता, अहिंसेचा प्रसार व्हायला हवा. यासाठी गोखले एज्युकेशन सोयायटीच्या माध्यमातून ही परिषद घेण्याचा मान मिळाला आहे. याद्वारे संस्थेच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी मोठे काम उभे करण्याचा मानस आहे. -प्रा. डॉ. दीप्ती देशपांडे, विभागीय सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी

सर डॉ. एम. एस. गोसावी पुरस्काराची सुरुवात..
यावर्षी पासून संस्थेतर्फे ‘सर डॉ. एम. एस. गोसावी अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ या नावाने आपल्या जीवनकार्यात उत्कृष्ट कामगिरी आणि देशासाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार देण्यात येणार अाहे. या पुरस्काराची सुरुवात डॉ. अनिल काकोडकर यांना पुरस्कार देऊन केली जाणार अाहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या देणगीमधून या पुरस्काराचे वितरण केले जाणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...