आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्षावीन रुक्ष अवघी ही सृष्टी, नको वामदृष्टी वृक्षाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वृक्षावीनरुक्ष अवघी ही सृष्टी,
नको वामदृष्टी वृक्षाकडे ।।
वृक्षावीन व्यर्थ लक्षवोनी प्राण,
करा संगोपन वृक्षाचे ते...।।
किंवा
अहो वृक्ष ज्यो बहू थोर केला
संसार ज्याचा आाजि धन्य झाला...
असावृक्षांवरच हरिपाठ लिहून वृक्षांची सामाजिक जाणीवर व्यक्तीव्यक्ती पर्यंत पाेहाेचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपंग नारायणरावांचे काम बघितले, तर अापण त्यांना सलाम केल्याशिवाय राहत नाही.

टाकळीराेड येथील ६२ वर्षांचे नारायण गर्भे अपंग असूनही अापल्या कविता वृक्षस्त्राेत्र, हरिपाठ, वृक्षमाहात्म्य यातून संदेश देतात ताे थक्क करणारा अाहे. त्यांचे शिक्षण फक्त चाैथीपर्यंतचे. पण फाडफाड इंग्रजी बाेलणाऱ्यालाही यांची इंग्रजी भुवया उंच करायला लावते.. केवळ कविताच नाही तर छाेट्या नाटुकल्या लिहिणे, ज्ञानप्रबाेधन, िनसर्गप्रबाेधन, ग्रामीण भागातील अनिष्ट चालीरीती, प्रथा दूर करण्यासाठी त्यांचे अखंड कार्य चालू अाहे. या कामाबराेबरच वृक्षाराेपण करा पण फक्त झाडं लावूच नका, तर त्यानंतर बाळाची जशी अापण सेवा करताे, तसेच वृक्षाच्या वाढीसाठी त्याच्याकडे लक्ष द्या, अशी सूचना करत कविता, भारुड स्वरूपाची गीते गावेगावी जाऊन समाज सुधारण्याचे त्यांचे कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच अाहे.
वृक्षावीननाही मानवा निवारा
व्यर्थ हा पसारा वृक्षावीन
तसेचवृक्षावीनपुष्पे येतील काेठून
हरीचे पूजन कैसे मग
असा प्रश्न विचारत ते अनेकांना झाडं लावण्यासाठी प्रवृत्त करतात. याच संदर्भात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम हाेतात विशेष म्हणजे या कार्यक्रमांची फलश्रृती वृक्षाराेपणाने हाेते.

बालवयापासूनच सेवा
मुळचेसंगमनेरच्या नांदूर खंदरमाळ येथील असलेले नारायणरावांनी हा जनसेवेचा वसा वयाच्या अकराव्या वर्षापासूनच घेतला अाहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विसाव्या वर्षीच ज्याेतिषशास्त्राचा अभ्यास देखील सुरू केला. हे काम ते फक्त गाेरगरिबांसाठी करतात. अाच ६२व्या वर्षीही त्यांची ही सेवा अखंड सुरू अाहे अाणि पुढेही राहील असे ते अभिमानाने सांगतात.

शासनाकडून मानधन नारायणरावांच्याविविध पातळ्यांवरील कामाची दखल घेऊन, त्यांच्या साहित्याचा विचार करत शासनाने त्यांचा वृद्ध अपंग कलावंत म्हणून गाैरव करत दरमहा ५०० रुपये मानधन सुरू केले अाहे.