आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाैद्याेगिक उत्पादनासाठी जगाची नजर अाता भारताकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाैद्याेगिक उत्पादनांच्या निर्मितीच्या दृष्टीने भारताकडे जगाची क्षमता पूर्ण करू शकणारा देश या भावनेने पाहिले जात अाहे. जागतिक समुदायाच्या नजरा भारताकडे लागल्या असून, भावी काळात अाैद्याेगिक उत्पादनाचा हब म्हणून महाराष्ट्रालाही संधी मिळणार असल्याने त्याचा सर्वाधिक फायदा लघु उद्याेजकांनाच मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
लघु उद्याेग भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशानाच्या समाराेपावेळी मुख्यमंत्री मार्गदर्शन करीत हाेते. व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडे, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन,परिषदेचे उद‌्घाटक काेकयू कॅम्लिनचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांच्यासह लघु उद्याेग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष भूषण वैद्य, राष्ट्रीय महामंत्री अाेमप्रकाश मित्तल, जिल्हाध्यक्ष मारुती कुलकर्णी हाेते.
पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ची घाेषणा केली असून, इतर देशांच्या तुलनेत पन्नास टक्क्यांवर लाेकसंख्या तरुणांची, कामाचा दरही कमी असल्याने उत्पादन मूल्य कमी अाहे अाणि क्षमताही खूप अाहेत. अाज चीन समृद्ध अाहे, पण त्यांच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात मानव संसाधन उपलब्ध नाही. मजुरीचा दरही परवडणारा अाहे. अशीच वेळ अमेरिकेवरही अाली हाेती, तेव्हा त्यांनी चीनमध्ये उत्पादन हलविले हाेते. अाज तीच वेळ चीनवर अाली असून, भारताकडून उत्पादन करून घ्यायच्या तयारीत चीन अाहे. केवळ हाच देश नाही, तर युराेप, अमेरिकाही भारताकडे याच अाशेने पाहत अाहेत अाणि महत्त्वाचे म्हणजे भारत या क्षमता पूर्ण करू शकताे, याचा विश्वासही जागतिक समुदायात वाढीस लागत अाहे.
कामगारकायद्यात करणार दुरुस्ती : सध्याचेकामगार कायदे ना कामगारांच्या हिताचे अाहेत ना उद्याेजकांच्या, त्यामुळे त्यात याेग्य ती दुरुस्ती केली जाणार असून, ही प्रक्रिया सुरू अाहे. कामगार कायदे कामगारांच्या हिताचे असतील, अधिक राेजगार त्यांना उपलब्ध झाला पाहिजे, याकरिता त्यात तरतूद असेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
लघु उद्याेजकांना सर्वाधिक फायदा
भारतातउत्पादन प्रकल्प टाकणारी कंपनी केवळ भांडवल अाणि मशिनरी अाणते, पण लागणारे कामगार, कच्चा माल, वाहतूक, पुरवठादार यांसारख्या बाबी देशातूनच त्यांना उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे संपूर्ण अार्थिक प्रक्रिया विकसित हाेते. यात सर्वाधिक फायदा लघु उद्याेगांनाच हाेणार अाहे. ही संधी मिळणार असली, तरी त्याकरिता काैशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे अाहे. त्यासाठी लघु उद्याेजकांनी पुढे यायला हवे, यातूनच अापण महाराष्ट्राला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू शकताे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
>‘एमअायडीसी’मध्ये शासनाचे येणारे कुठलेही धाेरण प्रभावीपणे राबविण्याची पुरेशी क्षमता नाही. त्यामुळे लघु सूक्ष्म उद्याेगांकरिता सर्वसमावेशक नवीन संस्था सुरू करावी.
>लघु सूक्ष्म उद्याेगांकरिता केंद्र सरकारच्या धर्तीवर नवीन मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.
>प्रत्येक महसूल विभागात एक भव्य प्रदर्शन केंद्र उभारण्यात यावे.
>शासकीय निमशासकीय विभाग, सर्व महामंडळे यांच्या खरेदीत सूक्ष्म लघु उद्याेगांना त्यांचा वाटा मिळण्यासाठी याेग्य तरतूद हवी.
>‘एमअायडीसी’ने त्यांच्या अाैद्याेगिक वसाहतीत तीन टक्के भूखंड महिला उद्याेजिकांसाठी राखीव ठेवावेत.
>पॅकेज स्कीम, प्राेत्साहन अनुदान याेजनांची पुनर्रचना करण्यात यावी आदी ठराव या अधिवेशनात झाले.
लघु उद्याेग भारतीची नवी कार्यकारिणी जाहीर
लघुउद्याेग भारतीची महाराष्ट्र राज्याकरिताची नवी कार्यकारिणी या वेळी जाहीर करण्यात अाली. त्यात राज्य अध्यक्षपदी रवींद्र प्रभुदेसाई (पीतांबरी उद्याेग), राज्य उपाध्यक्षपदी याेगेशभाई कनानी (नाशिक), रमेश गाेकर्णा (अाैरंगाबाद), चंद्रकांत रानडे (यवतमाळ), गाेविंदराव लेले (सातारा), महामंत्रीपदी रवींद्र साेनवणे (पुणे), सहमंत्रीपदी अंजनीकुमार मुंदरा (जळगाव), अरविंद पाेटे (नागपूर) अाणि संजय देशमाने (उस्मानाबाद) यांची िनवड करण्यात अाल्याची घाेषणा अाबासाहेब देशमुख यांनी केली.
लघु उद्योग भारतीच्या अधिवेशनात बाेलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समोरील छायाचित्रात लघु उद्याेग भारतीचे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पदाधिकारी अन्य मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...