आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुबाबदार दणकट जावा, यझदींची बाइकप्रेमींना भुरळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या चार वर्षांपासून नाशकात रुजलेल्या वर्ल्ड जावा डेनिमित्त यझदी जावा क्लबतर्फे दाेन ठिकाणी दुचाकींचे प्रदर्शन रंगले. जुन्या मात्र अाजही रुबाबदार दिसणाऱ्या या बाइक बघायला बाइकप्रेमींनी गर्दी केली हाेती. नाशिकमधील जावा अाणि यझदीप्रेमी बाइकस्वारांपैकी सुमारे १२५ हून अधिक जावा-यझदी दुचाकींना एकत्र पाहण्याचा याेग बाइकप्रेमींसाठी माेठी पर्वणी ठरली. 
 
काॅलेजराेडवरील श्रद्धा माॅल अाणि गंगापूरराेडवर प्रसाद सर्कलनजीक या प्रदर्शनास सकाळी १० पासूनच प्रारंभ करण्यात अाला. पाच वर्षांपासून असलेला जावा-यझदीचालकांचा गतवर्षीपर्यंत असलेला एकमेव क्लब यंदा विभाजित झाला. नाशकात चालक दरवर्षी एकत्र येऊन जावा डे साजरा करतात. या दुचाकींची निर्मिती १९९६ सालीच बंद पडलेली असतानाही तब्बल वीस वर्षांनंतरही त्या गाड्यांची चांगली देखभाल-दुरुस्ती करून त्यांना दरवर्षी किमान एकदा तरी रस्त्यावर अाणले जाते. दरवर्षी जुलैच्या दुसऱ्या रविवारी हा उपक्रम साजरा केला जातो. रविवारी शहरात झालेल्या या इव्हेंटमध्ये जावा-यझदी या नावाजलेल्या कंपन्यांच्या गाड्यांची जुनी रुबाबदार मॉडेल्स नाशिककरांना पाहायला मिळाली. या मॉडेल्समध्ये जावा, रोडकिंग, क्लासिक, सीएलटू, बी टाइप, डीलक्स आदी प्रकारच्या बाईक्स सादर झाल्या. 

झेको स्लोव्हाकियात उत्पादित होणाऱ्या रुबाबदार, दणकट जावा मोटारसायकल्सने जगभरातील नागरिकांना भुरळ घातली होती. १९६० च्या दशकात त्या अायात करण्यात येत हाेत्या. १९६८ नंतर त्यांचे उत्पादन भारतातही करण्यात येऊ लागले. १९७४ मध्ये जावाच्या नवीन माॅडेलचे नाव यझदी असे करण्यात अाले. जावा १५० सीसीपासून ५०० सीसीपर्यंत हाेत्या. त्यांची अाेगर, पेराक, सीझेड, जावा जेट ६०, यझदी ६०, क्लासिक अशी अनेक माॅडेल्स बाजारात लाेकप्रिय ठरली हाेती. ही सर्व माॅडेल्स रविवारच्या रॅलीत नाशिककरांना पाहायला मिळाली. नाशिकसह देवळाली कॅम्प, दिंडोरी, मालेगाव, इगतपुरी आणि पुण्याहूनही बाईकप्रेमी या शोमध्ये सहभागी झाले हाेते. विविध सामाजिक उपक्रम करणाऱ्या जावा यझदी क्लबच्या वतीने यंदा १०० जागांवर वृक्षाराेपण करण्यात अाल्याचे अंबरीश माेरे यांनी सांगितले. तर टू स्ट्राेक्स क्लबच्या वतीने नाशिक ते लेह प्रवास केलेली दुर्मीळ राजदूत जीटीएसही प्रदर्शनार्थ ठेवण्यात अाली हाेती. ‘जावा बायझन’ मुख्य अाकर्षण ठरल्याचे विनय चुंबळे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...