आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक डावखुरेदिन विशेष : डावखुऱ्या व्यक्तींच्या अडचणी मांडण्यासाठी अाज विशेष मेळावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उजव्यांच्या दुनियेत डावखुऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष जात नाही. डाव्यांना मिळणारी ही ‘डावी’ वागणूक त्यांना नैराश्याकडे अाेढण्यास कारणीभूत ठरते. या पार्श्वभूमीवर जागतिक डावखुरेदिनाचे अाैचित्य साधून रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता गंगापूरराेडवरील चिंतामणी मंगल कार्यालयात संमेलन हाेत अाहे. यात डावखुऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे शाेधण्याचा प्रयत्न हाेणार अाहे. 
 
बऱ्याच व्यक्ती या डावखुऱ्या असतात. परंतु, उजव्यांपेक्षा त्यांचे प्रमाण कमीच असते. या व्यक्ती डावखुऱ्या का असतात, त्यांना उजव्यांच्या दुनियेत काेणत्या अडचणींना सामाेरे जावे लागते अादी प्रश्नांवर डावखुऱ्यांच्या मेळाव्यात चर्चा हाेईल. मेळाव्यास उजव्यांनीही उपस्थित रहावे, असे अावाहन चंद्रकांत राऊत, नयना अाव्हाड, राम काकड, संताेष देशमुख, सिद्धी अाव्हाड यांनी केले अाहे. माहितीसाठी ९४२३७१६१६२ /९४०३३७०७६४ वर संपर्क साधावा. 
 
या उपाययाेजनांवर हाेईल चर्चा : सगळी मुले एकत्र असताना जाणीवपूर्वक ‘डावखुरे किती जण अाहेत’ याची गणना करावी. त्यामुळे अापल्यासारखे बरेच अाहेत याचा संबंधितांना अंदाज येईल. डावखुऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत बाकाच्या डावीकडे बसवावे. डावखुऱ्या मुलांना उंचावर बसवले की त्यांना स्वत: लिहिलेले वाचायला साेपे जाते. 
 
या अाहेत डावखुऱ्यांसमाेरील अडचणी... 
>नृत्य करताना (भरत नाट्यम किंवा कथ्थक) बऱ्याच स्टेप्स उजव्या बाजूने शिकवल्या जातात. डावखुऱ्यांना या स्टेप्स करणे अवघड जाते. 
>शाळा, महाविद्यालयांतील खुर्चीच्या डेस्कवर लिहण्यासाठीची जागा उजव्या बाजूने असते. त्यामुळे डावखुऱ्यांना या डेस्कवर लिहिताना अडचण येते. 
>प्रसाद घेणे, अाचमण करणे, अारती अाेवाळणे यांसारख्या धार्मिक क्रिया उजव्या हाताने कराव्यात असे मानले जाते. अशा वेळी डावखुऱ्यांची फजिती हाेते. 
>डाव्या हाताने लिहिणाऱ्यांचा हात शब्दांवरून फिरताे. त्यामुळे अक्षर पुसण्याची किंवा धुसर हाेण्याची शक्यता असते. 
>बेंचवर उजव्या बाजूला बसल्यास शेजारील विद्यार्थ्याच्या उजव्या हातास त्याचा डावा हात लागताे. 
>हस्तांदाेलन करताना समाेरचा माणूस उजवा हात पुढे करताे. डावरी माणसं अापला डावा हात पुढे करतात तेव्हा गाेंधळ उडताे. 
>सर्वच यंत्र अाणि साहित्यांची रचना उजव्या हात वापरणाऱ्यांच्या साेयीची केलेली असल्याने डावखुऱ्यांना काम करताना वेळ लागू शकताे. 
बातम्या आणखी आहेत...