आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धेतून उलगडणार आता अंतराळ विज्ञान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वर्ल्डस्पेस वीक ते १० ऑक्टोबरदरम्यान असून, या सप्ताहात जगभरात विविध उपक्रम राबविले जातात. यानिमित्त नाशिकस्थित कल्पना युथ फाउंडेशनतर्फे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये खगोल शास्त्राबाबत कुतूहल निर्माण व्हावे जागतिक स्तरावर होणाऱ्या खगोल विषयक घडामोडींची माहिती असावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फाउंंडेशनतर्फे जागतिक खगोल सप्ताहात विविध उपक्रम राबविण्याचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धांसाठी कल्पना युथ फाउंडेशन कडे विद्यार्थ्यांनी नावे नोंदवावीत.
शालेयविद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा इयत्तावी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी अंतराळ यान (स्पेस क्राफ्ट), चांद्र वसाहत (मून कॉलनी), मंगळ मोहीम (मार्स मिशन), परग्रहवासी (एलिअन्स), भारतीय उपग्रह (इंडियन्स’टेलाइट) या विषयांवर आपली कल्पनाशक्ती वापरून पोस्टर बनवायचे आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे.
महाविद्यालयीनिवद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा यानिबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘मंगळ मोहीम आणि तिचे फायदे’ (मार्स मिशन अँड इट्स बेनिफीट्स), ‘नाशिकमध्ये अंतराळ विज्ञान प्रसाराचे उपाय’ (प्लॅन टू प्रोमोट स्पेस सायन्स इन नाशिक), ‘अंतराळ दुर्बिण’ (स्पेस टेलेस्कोप), ‘मला अंतराळवीर का व्हायचे आहे’ (व्हाय आय वॉण्ट टू बिकम अॅस्ट्रोनॉट) आणि ‘माझा आवडता अंतराळवीर’ या विषयांवर निबंध लिहायचे आहेत. निबंध स्पर्धेची अंतिम मुदत ही ३० सप्टेंबर आहे.
महाविद्यालयीनविद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा ‘अंतराळातीलघडामोडी आणि त्यांचे व्यवस्थापन’ ( स्पेस डेब्री अँड इट्स म’नेजमेंट), ‘भारतीय अंतराळ मोहीम’ (इंडियन स्पेस मिशन), भारताचे जागतिक अंतराळ विज्ञानातील स्थान (इंडियास कॉन्ट्रिब्युशन इन वर्ल्ड स्पेस सायन्स), महाराष्ट्राचे अंतराळ शास्त्रविषयक व्हिजन २०२० (महाराष्ट्राज‌् विजन २०२० फॉर स्पेस सायन्स) सोशल नेटवर्किंगचा अंतराळ शास्त्र प्रसारातील योगदान (रोल ऑफ सोशल नेटवर्किंग फॉर स्पेस सायन्स अवेअरनेस) या विषयांचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम मुदत २५ सप्टेंबर आहे.
जागतिक स्तरावर असावी पोहोच
जागतिकस्तरावर स्पेस एज्युकेशन आणि स्पेस सायन्स विषयांवर अनेक स्पर्धा, तसेच घडामोडी होत असतात. या सर्व गोष्‍टी नाशिकच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात त्यांना या उपक्रमात सहभागी होता यावे, म्हणून कल्पना युथ फाउंडेशनतर्फे या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. जयदीपशहा, अध्यक्ष,कल्पना युथ फाऊंडेशन