आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळून सार्‍या जणी, करू जागर निर्भयतेचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- "जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला शहर आणि परिसरात विविध कार्यक्रम तसेच सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. वेगवेगळ्या संस्थांतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. काही संघटनांतर्फे कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला गौरवण्यात येणार आहे.

महिलांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमांसह या दिनानिमित्त खास महिला विक्रेत्यांसाठी दोनशे जागांचे वाटप करण्यात येत आहे, तर देशाच्या पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याची जोरदार मागणी अखिल भारतीय समता परिषदेतर्फे करण्यात आली.|

‘जन्माला आले सारेच जण नाराज झाले.. नवर्‍याची धमकी, सासूचा धाक.कारण मी मुलगी म्हणून जन्माला आले’, आई, बहीण, बायको एवढेच नव्हे तर गर्लफ्रेंडही हवी, मग मुलगीच का नको, असा खडा सवाल उपस्थित करीत ‘मिळून सार्‍या जणी करूया जागर निर्भयतेचा’, असा संदेश महिला व मुलींनी पथनाट्यातून दिला.

निमित्त होते, जागतिक महिला दिनानिमित्त इंदिरानगर येथील डे-केअर शाळेत कल्याणी महिला सहकार प्रबोधिनीच्या वतीने आयोजित पथनाट्य स्पर्धेचे. या वेळी प्रबोधिनीच्या अध्यक्षा अँड. अंजली पाटील, ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, माधवी बुरकुले, मुग्धा सापटनेकर, प्रतिभा महाले, डॉ. ज्योती सोनावनी, निमा विसपुते आदी उपस्थित होते.

स्त्रीशक्तीचा जागर, बेटी म्हणजे धनाची पेटी, असा संदेश देण्याबरोबरच सामाजिक प्रबोधन करणारे असंख्य विषय महिलांनी पथनाट्यातून मांडले. दोनदिवसीय या स्पर्धेतून शुक्रवारी महिला दिनी शालिमार चौकात पाच पथनाट्यांचे सादरीकरण होणार असून, त्यातून तीन स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे. परीक्षक म्हणून वासंती देशपांडे, अपर्णा क्षेमकल्याणी, धनंजय वाबळे यांनी काम पाहिले.

यांनी केले सादरीकरण
जागृती शाखा (जागर स्त्रीशक्तीचा), स्नेहवर्धिनी महिला मंडळ (करूया जागर जागर), कोठारी कन्या मंडळ (पणती गेली मशाल पेटवून), र. ज. बिटको हायस्कूल (जागर स्त्रीशक्तीचा), वरद महिला भजनी मंडळ ( स्त्रीभ्रूण हत्या), रुंगटा हायस्कूल (ही लढाई माझीच), गोदावरी डी.एड. कॉलेज (स्त्रियांचे समाजातील प्रश्न), केटीएचएम महाविद्यालय यांनी पथनाट्य सादर केले.

सीमा पुरी यांचे व्याख्यान
एशियन पेंट्स आणि आयआयआयडीच्या मॅनेजिंग कमिटीतर्फे हॉटेल एमराल्ड पार्कमध्ये सायंकाळी 7.30 वाजता सीमा पुरी यांचे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी काही महिलांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. महिला दिनानिमित्त एशियन पेंट्स प्रो या एक्सक्लुझिव्ह ऑवलाइन सर्व्हिसचे उद्घाटन केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयआयआयडीच्या अध्यक्षा सुप्रिया नाठे, मानद सचिव राकेश लोया यांनी केले आहे.

मनपा महिला बालकल्याण समिती
मनपातर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात 8 मार्चला सकाळी 10 वाजता परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण होणार आहे. याप्रसंगी महापौर यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, शिवसेना महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, अमोल कुलकर्णी, आयुक्त संजय खंदारे, खासदार समीर भुजबळ, खासदार प्रतापदादा सोनवणे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्ह्यातील सर्व आमदार, सर्व गटनेते, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सिद्धिविनायक संस्थेतर्फे आरोग्य तपासणी
सिद्धिविनायक सामाजिक संस्थेतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्ता अँक्सिडेंट व क्रिटिकल केअर हॉस्पिटल, खुटवडनगर येथे सकाळी 9 वाजता शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी स्त्रीरोगतज्ञ रुचिता पावसकर तपासणी करतील. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राज निकम यांनी केले आहे.

‘विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव द्या’
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी महात्मा फुले समता परिषदेने उपजिल्हाधिकार्‍यांकडे केली. देशातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. महिलांच्या शिक्षणासाठी फुले दाम्पत्याने पुण्यात पहिली शाळा सुरू केली. महिलांना सक्षम करण्याची सुरुवात पुण्यातून झाल्याने पुणे विद्यापीठास त्यांचे नाव देण्याची मागणी संतोष सोनपसारे, स्मिता अंबुसकर, दीपक पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.

आरोग्य तपासणी
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी डॉ. नीलिमा राजगुरू यांच्या आयु-स्पा आयुर्वेद चिकित्सालयाच्या वतीने सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत डिसूझा कॉलनी येथील चिकित्सालयात स्तन तपासणी व मॅमोग्राफी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

तसेच, 15 मार्चपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळात 10 व 11 मार्च रोजी गर्भसंस्कार माहितीवर्ग, 13 मार्च रोजी आरोग्यमैत्रीण हा अनोखा योगावर आधारित उपक्रम, 15 मार्च रोजी वासंतिक वमन या विषयावर सायंकाळी 5 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच 9 ते 15 मार्चपर्यंत सकाळी 11 ते 2 या वेळात सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कायदेविषयक शिबिर
अवेकनिंग जागृती को-फाउंडेशन बाय इंटरविडा आणि इंटरविटा या संस्थेच्या महिला सेलअंतर्गत गीतांजली बागुल, मनीषा पुराणिक फुलंब्रीकर यांचे मोफत कायदेविषयक शिबिर आयोजित केले होते. कोणाला कायदेविषयक सल्ल्यासाठी 9970341962 वर संपर्क करावा.

जिजाऊ महिला संस्था
जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेतर्फे ‘राजमाता जिजाऊ आत्मसन्मान पुरस्कार’ वितरण 8 मार्चला सकाळी 11 वाजता कालिदास कलामंदिरात करण्यात येणार आहे.

प.पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, उद्योजिका मनीषा पाटील, आमदार जयप्रकाश छाजेड, आमदार निर्मलाताई गावित, आमदार माणिकराव कोकाटे, शैलेश कुटे, नानासाहेब महाले, राजेंद्र महाले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, महिला अध्यक्ष वत्सला खैरे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, नगरसेविका योगीता आहेर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कावेरी साकार, सुनीता आहेर, प्रतिभा सानप, सुरेखा जगताप, सुनीता अहिरराव, ज्योती वाघ, दीपाली मुकणे, प्रज्ञा रणवीर, भैरवी कुवर, त्यासोबतच अमेरिकेत उल्लेखनीय कार्य करणार्‍या शलाका काकतकर, मॅडम ख्रिस्ती, मंजू वालिया, हरिता कोइमपट्टी, प्रियांका शेट्टी, सुनीता पाटील आदींचा सत्कार करण्यात येईल.