आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! नाशिकमध्ये महिनाभरात 55 बालकांचा मृत्यू, तर एप्रिलपासून 187 मुले दगावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्हेंटिलेटर न  मिळाल्याने नाशिकमधील सरकारी रुग्नालयात 55 बालकांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच,  या रुग्णालयात एप्रिलपासून आत्तापर्यंत 187 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली. परंतु, प्राशासन हे आकडे चुकीचे असल्याचे सांगत आहे. रुग्णालयातील डॉ. सुरेश जगदाळे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या मुलांमधील बहूतेकांना क्रिटिकल परिस्थितीत असताना रुग्नालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची वाचण्याची शक्यता अत्यंत कमी होती. 
 
गंभीर परिस्थितीत नवजात बालकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरचा एकही संच राज्यभरातील एकाही शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर गुरुवारी (दि. ७) राष्ट्रवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी १८ इनक्युबेटरची क्षमता असलेल्या विशेष नवजात शिशू दक्षता विभागात ५० ते ६० नवजात बालकांवर उपचार केले जात असल्याचे दिसून आले. 
 
जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील व्हेंटिलेटर इनक्युबेटरच्या समस्यांसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत आमदार जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना जाब विचारला असता ग्रामीण भागातून येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांना परत न पाठवता याच ठिकाणी उपचार उपलब्ध करून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जाधव यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधून या विषयाची माहिती देत शुक्रवारी (दि. ८) विधान परिषद अध्यक्षांकडे बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच, जिल्हा रुग्णालयातील सर्व प्रकरण विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे मांडणार असल्याचे सांगितले. 
 
बांधकाम अभियंत्यांनाही धरले धारेवर : दरम्यान,आमदार जाधव यांनी रुग्णालयातील गळतीसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेलार यांना जाब विचारला असता शेलार यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे जाधव यांनी नाराजी व्यक्त करत याची तक्रार बांधकाम मंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.
 
मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र... 
जिल्हा शासकीय रुग्णालयात २०० बालमृत्यू होणे अतिशय गंभीर बाब आहे. नवजात बालक केंद्रातील व्हेंटिलेटर इन्क्‍युबेटर, तसेच बालमृत्यू संदर्भात विचारणा केली असता अधिकारी म्हणतात, की महापालिका रुग्णालयातील बालरुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात म्हणून बालरुरग्ण वाढले. मात्र, अशी जबाबदारी झटकून चालणार आहे का? या विषयासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. 
- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 
बातम्या आणखी आहेत...