आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी पूजनाने सेवेकऱ्यांचे दुष्काळमुक्तीसाठी साकडे गोदाकाठ दुमदुमला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘श्रीस्वामी समर्थ,’ ‘दत्ता दिगंबरा, दत्ता दिगंबरा’चा जयघोष... रामकुंडात संथ वाहणारे पाणी... अाकर्षक विद्युत रोषणाई... अन् मंत्रोच्चाराच्या जयघोषात गंगा-गोदावरी माता पर्जन्यदेवतेला शेकडो सेवेकऱ्यांनी दुष्काळमुक्तीसाठी साकडे घातलेे. गाेदातीरी गंगा-दशहरा उत्सव उत्साहात संपन्न झाला.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग गंगा-गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी रामकुंडावर गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. दरवर्षी ज्येष्ठ शुक्ल ते ज्येष्ठ शुक्ल १० या दहा दिवसांच्या कालावधीत गंगा दशहरा सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. दुपारी तीन वाजता गंगापूररोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची ढोल-ताशांच्या, बॅण्डपथकाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुरुषांच्या हातात भगवे झेंडे, तर महिला तुुळशी वृंदावन घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. रामकुंडावर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चाराच्या जयघोषात गंगापूजन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, पालिका शिक्षण मंडळाचे सभापती संजय चव्हाण, महेश हिरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते.

रामकुंड केले स्वच्छ, मात्र गोदाकाठ अस्वच्छ
महापालिकाप्रशासनाने रामकुंड, लक्ष्मणकुंडाची स्वच्छता करून शुक्रवारी रात्री पाणीही सोडले. मात्र, गोदाकाठच्या इतर परिसराची स्वच्छता ठेवण्याकडे काणाडोळा केल्याने ‘रामकुंड स्वच्छ, गोदाकाठ अस्वच्छ’ असे चित्र दिसत होते.
बातम्या आणखी आहेत...