आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worst Situation Of Road In Nashik Because Of Rain, No Action Taken

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाची सुटी, खड्डय़ांशी मात्र कट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक / नाशिकरोड- सलग तीन दिवस आलेल्या सुट्या लक्षात घेऊन जणू काही वरुणराजाने काहीशी उसंत घेतल्यानंतर महापालिकेच्या मुखंडांनी जागे होऊन शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन दिवसांत ही मोहीमच बंद झाल्याचे चित्र नाशिकमध्ये दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भरपावसात पाण्यात डांबर ओतून भरलेले खड्डेही पूर्ववत उघडेबोडके पडल्यामुळे नाशिककरांची कसरत काही संपलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून दररोज संततधार पाऊस सुरू होता. मात्र, शुक्रवार व शनिवारी तुलनेने पावसाने बर्‍यापैकी उघडीप घेतली. पाऊस सुरू असल्यामुळे डांबर टिकत नाही, परिणामी भरलेले खड्डे पुन्हा उघडे पडतात, असा दावा करणार्‍या पालिकेच्या मुखंडांना या दोन दिवसांत बर्‍यापैकी खड्डे बुजविण्याची संधी होती. मात्र, सुटीचा फिव्हर एन्जॉय करण्यासाठी लोकप्रतिनिधींपासून तर अधिकार्‍यांपर्यंत सर्वांनीच धन्यता मानल्यामुळे खड्डे बुजवण्याची कारवाई थंड बस्त्यात गेली.

वाहतूकही होती कमी
सुटीमुळे शहरात दररोज वाहणारा वाहनाचा पूरही आटलेला होता. वाहतूक कमी असल्यामुळे खड्डे बुजविण्याची कारवाई पालिकेला अधिकच चांगल्या पद्धतीने करता आली असती. प्रत्यक्षात त्यासाठी आयुक्तांपासून तर बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांपर्यंत कोणीच नियोजन केलेच नाही.

खड्डय़ांच्या रस्त्यातून मनसेचे नवनिर्माण
रस्त्यावर खड्डे की खड्डय़ांत रस्ता अशी दयनीय अवस्था नाशिकरोडला जेलरोड विभागातील प्रभाग 36 मधील जेलरोड-उपनगर रस्त्याची झाली आहे. नगरसेवक व नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतरदेखील वर्षभरात रस्त्याच्या स्थितीत सुधारणा होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, रस्त्यालगतच्या शेलार मळ्यात सत्ताधारी मनसेचे नगरसेवक संपत शेलार यांचे निवासस्थान आहे. जेलरोड परिसरातील सर्वाधिक लोकवस्तीतील रहिवाशांचा वाहतुकीसाठी एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर वर्दळ असते. या रस्त्यावर सर्वाधिक खड्डे नगरसेवकाच्या निवासस्थानासमोरच आहेत. नगरसेवक शेलार यांनी आठवड्यापूर्वी बांधकाम विभागाकडे पत्र व फोनद्वारे तक्रार केल्यानंतर सोमवारी डागडुजीचे आश्वासन मिळाले.