आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओझरला आजपासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जगद््गुरूजनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अाेझर येथे शुक्रवारी (दि. ९) जय बाबाजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात अाले अाहे. दुपारी १२ वाजता ओझर आश्रम येथे ही स्पर्धा हाेणार अाहे. महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटूंच्या सहभागाने ही स्पर्धा रंगणार आहे.
श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या संकल्पनेतून वेरूळ येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते. स्पर्धेसाठी दीड लाखाची बक्षिसे असून, मानाच्या कुस्तीसाठी २१ हजारांचे बक्षीस आहे. स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते कॅप्टन अाप्पासाहेब ढुस, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, सप्तशंृगी निवासिनी ट्रस्ट वणीचे मुख्य अधिकारी सुदर्शन दहातोंडे, येवल्याचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कुस्ती स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून दीपक जुंद्रे , विठ्ठल कर्पे, धर्मा जाधव, के. डी. चोपडे, सोमनाथ पळसकर, रोहिदास पहेलवान (धुळे), सूरज पवार (मनमाड), जनार्धन अधाने, राजू चव्हाण, नवनाथ औताडे आदी काम पाहणार आहेत.
पहिलवानांनी शौकिनांनी खिलाडूवृत्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन झुंबर मोडके, निवृत्ती कांडेकर, कमलाकर गोडसे, केशव गोसावी, ज्ञानेश्वर गामणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र पवार- ९८२२६६१५५० अाणि मुकुंद पिंगळे - ९८६००६५३५५ यांच्याशी संपर्क साधता येईल.
बातम्या आणखी आहेत...