आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरणाेत्सर्ग नियम उल्लंघनाबद्दल प्रथमच शहरातील सहा रुग्णालयांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शरीरास अत्यंत घातक ठरणाऱ्या किरणोत्सर्गाच्या नियमावलीला केराची टोपली दाखवून गेल्या काही वर्षांपासून शहरात एक्स-रेच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या ऑटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डाच्या (परमाणू ऊर्जा नियामक परिषद) पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात उघडकीस अाला अाहे. या पथकाच्या कारवाईत नियमांचे उल्लघंन करणाऱ्या नाशकातील सहा रुग्णालयांतील एक्स-रे मशीन सील करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, प्रथमच झालेल्या या कारवाईत एका रुग्णालयाला यंत्रसामग्री पुरविणाऱ्या वितरक कंपन्यांनाही कारणे दाखवा नाेटिसा बजावण्यात अाल्या अाहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बोर्डाचे पथक गुरुवारी (दि. २२) नाशकात दाखल झाले अाहे. किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होतो. त्याबाबत नियमावलीसुद्धा आहे. मात्र, त्याचे तंतोतत पालन होत नाही. देशभरातील अणुऊर्जेचा वापर करणारी सरकारी-खासगी रुग्णालये इतर अास्थापना, कंपन्यांमध्ये एईअारबीच्या किरणोत्सर्गासंदर्भातील नियमावलीनुसारच यंत्रसामुग्रीचा वापर करण्यास परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये रेडिएशनसंदर्भात एक्स-रे सिटीस्कॅन, डेंटल इक्विपमेंट, हृदयराेग शस्त्रक्रिया (कॅथलॅब), शस्त्रक्रियागृहातील यंत्रसामुग्री बसविण्यापूर्वी ऊर्जा नियामक परिषदेची परवानगी आवश्‍यक असते. यासाठी विविध अटी शतींची पूर्तता केल्यानंतरच परिषदेकडून रुग्णालयांना यंत्रसामुग्री बसवण्यासाठी परवानगी दिली जाते.
यासदर्भात परिषदेकडून वारंवार प्रसारमाध्यमांमार्फत अाराेग्य यंत्रणेकडून जनजागृती केली जाते. तरीही काही खासगी सरकारी रुग्णालयांमध्ये नियमावलीला फाटा देत एक्‍स-रे मशीन बसविण्यात आल्याचे प्रकार उघडकीस येत अाहेत. यासंदर्भात पथकाने नाशकातील दहाहून अधिक खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या असता चार रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री सील करण्यात अाली, तर दाेन डायग्नाेस्टिक सेंटर्सना नाेटीसा बजाविण्यात अाल्या अाहेत. पंचवटीतील हिरावाडीराेड भागातील सद‌्गुरू हाॅस्पिटल येथे रेडिअाेग्राफीच्या दाेन मशिन्स, मुंबई नाक्यावरील सुदर्शन हाॅस्पिटल शताब्दी हाॅस्पिटलचे एक्सरे मशीन सील करण्यात अाले अाहेत. तर साई हायटेक अाणि पवार डायाग्नाेस्टिक सेंटरच्या चालकांना कर्मचाऱ्यांच्या रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत अावश्यक नियमांचे पालन करण्याबाबत सूचना करण्यात अाल्या अाहेत.
विशेष म्हणजे, पंचवटीतील कारवाई केलेल्या हाॅस्पिटलला एक्सरे मशिन्स पुरविणाऱ्या कंपन्यांनीही नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून अाल्याने त्या दाेन कंपन्यांनाही कारणे दाखवा नाेटीसा बजावण्यात अाल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. २३) पुन्हा शहरातील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय खासगी रुग्णालयांची तपासणी केली जाणार अाहे.

दीडशेहून अधिक हाॅस्पिटल्सची यंत्रे सील
गेल्या वर्षभरात परिषदेच्या पथकाने देशभरात नवी दिल्लीपासून हैदराबाद, चेन्नई, रायपूर, लखनाै, कानपूरसह महाराष्ट्रातील मुंबई, अकाेला, अमरावती, पुणे, नागपूरमध्ये हाॅस्पिटलची तपासणी केली अाहे. यामध्ये जवळपास १५० ते १८० हाॅस्पिटलमधील एक्स-रे मशीनसह इतर रेडिएशनची यंत्रसामुग्री सील करण्यात अाली अाहे.

अाॅनलाइन परवानगी प्रक्रिया सुलभ
^अणुऊर्जेचा वापरकरणाऱ्या हाॅस्पिटलसह संस्थांनी तंत्रज्ञ, डाॅक्टर अाणि रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अावश्यक उपाययाेजना करणे गरजेचे अाहे. त्यानंतर यंत्रसामग्री कार्यान्वित करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या नियमानुसार परमाणू ऊर्जा नियामक परिषदेकडे परवानगी घेणे बंधनकारक अाहे. यासाठी परिषेदेने अतिशय साेप्या पद्धतीने अाॅनलाइन सुविधा एईअारबीच्या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिली अाहे. त्या माध्यमातून रुग्णालये, संस्थांना परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली अाहे. -डाॅ. अार. पी. कुलकर्णी, एईअारबी सदस्य
बातम्या आणखी आहेत...