आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • XI College Admission Start From Monday In Nashik

साेमवारपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया साेमवारपासून (दि. १५ ) सुरू करण्यात येणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया जुलैपर्यंत सुरू राहणार असून, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याच्या तरतुदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन प्रामुख्याने कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारच्या देणगीची मागणी केली जाऊ नये. तसेच बारावीपर्यंत विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जावे, असे शासनाने नियम घालून दिले आहेत. या दोन नियमांचे कठोर पालन केले जावे, अन्यथा स्वत: शिक्षण उपसंचालक महाविद्यालयीन यंत्रणांवर रितसर गुन्हे दाखल करतील, असा निर्णय गुरुवारी चांदवड येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

छात्रभारतीने लांबविली बैठक : शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या या बैठकीमध्ये छात्रभारतीच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दीड तास बैठक लांबवली. मुलींना मोफत शिक्षण मिळावे, विकास निधी घेतला जाऊ नये, प्रॉस्पेक्टसची फी निर्धारित असावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिक्षणाधिकार्‍यांनी योग्य कारवाई करण्याचे यावेळी आश्वासन दिले. यावेळी राकेश पवार, सागर निकम, विक्रम बिडवे, केदार फापाळे, दीपक देवरे आदी उपस्थित होते.

प्रवेशप्रक्रिया अशी
- प्रवेश अर्ज वितरण जमा करणे - दि. १५ ते दि. १८ जून २०१५
- संवर्ग निहाय गुणवत्ता यादी, प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे - दि. २२ जून
- गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश - दि. २२ ते दि. २५ जून
- रिक्त जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश - दि. २६ जून
- शिल्लक जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश - दि. २६ ते ३० जून
- प्रवेश पूर्ण झाल्यानंतरही रिक्त जागांवरील प्रवेशप्रक्रिया -दि. ३० जून ते दि. जुलै