आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबला फाशी; शहरात हाय अलर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक मुंबईबाॅम्बस्फाेटातील अाराेपी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वाेच्च न्यायालयाने शिक्कामाेर्तब केले असून, गुरुवारी (दि. ३०) सकाळीच त्याची अंमलबजावणी हाेणार असल्याने या पार्श्वभूमीवर नाशकात हाय अलर्ट घाेषित करण्यात अाले अाहे.
भद्रकाली, पंचवटी, सिडकाे, नाशिकराेड भागातील संवदेनशील ठिकाणांवर पाेलिसांनी बंदाेबस्त वाढवत नाकाबंदी सुरू केली अाहे. दाेन दिवसांपूर्वीच पंजाबमधील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हाय अलर्ट घाेषित केले हाेते. या पाठाेपाठ दुसऱ्याच दिवशी याकूब मेमन याच्या फाशीची शिक्षा सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने पुन्हा अलर्ट वाढविण्यात अाला अाहे. बुधवारी सायंकाळी पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षिततेचा अाढवा घेतला.

रेल्वेस्थानकावर बंदाेबस्त : नाशिकराेडरेल्वे स्थानकावरही सुरक्षा
वाढवण्यात अाली असून, प्रवासी गाड्यांची श्वानपथकाच्या साह्याने तपासणी केली जात अाहे.