आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावना अनाथाश्रम व यश फाउंडेशनला केले अन्नदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दिव्य मराठी केलेल्या 'जॉय ऑफ गिव्हिंग' अर्थातच 'देण्याचं सुख' या अभियानाअंतर्गत शहरातील दानशूरांसह अनेक सामाजिक संस्थांनीही भरभरून दान केले.
"दिव्य मराठी'कडे संकलित अन्नधान्य कळवण तालुक्यातील मानूर येथे 18 वर्षांपासून कार्यरत असलेल्या भावना अनाथ व निराधार बालगृहास तसेच एच. आय. व्ही. एड्सची लागण झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या यश फाउंडेशन या संस्थेस विभागून देण्यात आले.
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून 'दिव्य मराठी'ने २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान देण्याचं सुख हा सप्ताह राबविला होता. या उपक्रमाअंतर्गत वाचकांना अन्नदानाचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सर्वसामान्य नाशिककरांसह शहरातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती व व्यापारी आस्थापनांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत गहू, तांदूळ, तेल, डाळ, बाजरी असे संकलित झालेले धान्य सिलिकॉन व्हॅलीचे संचालक प्रमोद गायकवाड, "दिव्य मराठी'चे महाव्यवस्थापक मदनसिंग परदेशी, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांच्या हस्ते अनाथ आश्रमाचे संचालक रवींद्र सानप व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आले. "दिव्य मराठी'च्या कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक व्यवस्थापक हेमंत पवार यांनी केले. "दिव्य मराठी'ने केलेल्या आवाहनास भरभरून प्रतिसाद देत नाशिककरांनी आपल्या घासातला घास देत देण्याचं सुख अनुभवले.त्यामुळे या वर्षी एका आठवड्यात तब्बल 1500 किलो अन्नधान्य संकलित झाले होते.