आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:च्या अणुरेणूत साहित्य भरलेले यशवंतराव भावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - या देशाच्या राजकारणातील सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे यशवंतराव चव्हाण हाेते. ते विचार करून वाचत वा वाचन करून विचार करत. त्यांची खाेली विलक्षण हाेती. त्यांच्या हातात पुस्तक नाही असे कधीच झाले नाही. त्यांनी लिखाणही खूप केले; तसेच साहित्य अाणि कलेसाठी याेगदानही प्रचंड दिले. स्वत:च्या अणुरेणूतच साहित्य भरलेले असे यशवंतराव हाेते, असा संवाद ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी नाशिककरांशी साधला.

सार्वजनिक वाचनालयाच्या प. सा. नाट्यगृहाबाहेर यशवंतराव चव्हाण यांच्या नावाच्या काेनशिलेचे अनावरण भावे यांच्या हस्ते करण्यात अाले. त्यावेळी 'यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यातील याेगदान' या विषयावर ते म्हणाले की, एक विलक्षण माणूस महाराष्ट्राने अनुभवला. त्यांनी महाराष्ट्राला वळण लावले. त्यांचे पूर्ण जीवनच साहित्याने भरलेले अाणि भारलेले हाेते. साहित्य सहवास अाणि कलानगर ही जागाही साहित्यिकांना, कलाकारांना यशवंतरावांनीच दिली. पण, त्यांना अापल्या साहित्यविश्वाने कधीच साहित्यिक मानले नाही.

म्हणूनच साहित्यिक साहित्यात कितीही माेठे असले तरी मनाने खाेटे असल्याचे म्हणावे लागते. यशवंतराव साहित्य संमेलनाचे सात वेळा स्वागताध्यक्ष झाले, पाच वेळा त्यांनी संमेलनाचे उद््घाटन केले, पाच वेळा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले; पण त्यांना कधीही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करावेसे साहित्यिकांना वाटले नाही.

अाज मंत्र्यांच्या बंगल्यांना जी नावे दिसतात, ती यशवंतरावांनी दिली अाहेत. त्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला, विकास खेचून अाणावा लागताे. ताे स्वत: येत नाही असे ते म्हणत त्यांनी जे केले ते पुस्तकांच्या संख्येत माेजणे चुकीचे ठरेल. यशवंतराव अत्यंत बलदंड साहित्यिक, विलक्षण माणूस हाेते.

अखेरीस काेनशिला लावली
यशवंतरावचव्हाण यांचा फाेटाे अाणि काेनशिला यावरून अावाज उठवण्यात अाला हाेता. त्यानंतर सावानाच्या मुख्य कार्यालयात चव्हाणांचा फाेटाे लावण्यात अाला हाेता. तर शनिवारी नाट्यगृहाच्या भिंतीवर काेनशिलाही लावण्यात अाली. यावेळी सावानाचे अध्यक्ष विलास अाैरंगाबादकर अाणि इतर सदस्य उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...