आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल उशिरा, विद्यार्थ्यांची हुकली संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्पर्धां परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे लोकसेवा अभ्यासक्रमाचे निकाल तब्बल चार महिने उलटून गेल्यानंतरही झाले नाहीत.
निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आयबीपीएस तसेच राज्य शासनातर्फे घेण्यात आलेल्या तलाठी लिपिकपदांच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होता आले नाही. निकाल जाहीर करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठाकडे वारंवार करूनही वेळेत निकाल लागल्याने राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संधीपासून वंचित राहावे लागले आहे.

मुक्त विद्यापीठाच्या वतीने बी. ए. लोकसेवा आणि एम. ए. लोकसेवा या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ साठी जून-२०१६ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यापीठातर्फे परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे अपेक्षित असताना त्याला आता तीन ते चार महिने उलटून गेल्यानंतरही या दोन्ही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. विद्यापीठाकडून वेळेत निकाल जाहीर झाले असते तर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या करसहाय्यक या पदासाठी अर्ज करता आले असते. तसेच, आयबीपीएससाठीदेखील अर्ज करण्याची अखेरची मुदत १३ ऑगस्ट होती. तर, राज्य शासनातर्फे तलाठी लिपीक पदांसाठी नोकरभरती केली जात असून, त्यासाठी अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांपुढे होती.
परंतु, विद्यापीठाकडून निकाल उशीर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना संधी हुकली. परीक्षार्थींकडून विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांकडे वारंवार विचारणा करण्यात आली. परंतु, तांत्रिक बिघाडामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...