आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith Mobile Education Start Nashik

मोबाइलद्वारे मिळणार मुक्त शिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातत्याने नवनव्या उपक्रमांद्वारे ज्ञानगंगा घरोघरी नेणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वेबरेडिओ पाठोपाठ आता थेट मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचविण्याची तयारी सुरू केली आहे. सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरू होण्याचे संकेत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेबरेडिओवरील हवे ते लेक्चर ऐकता येईल. अत्यल्प शुल्कामुळे शहरासोबतच ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल.

मुक्त विद्यापीठाच्या या सेवेमुळे मोबाईलवरुनदेखील अभ्यास करणे शक्य होणार असून त्यासाठीची प्रक्रीया यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वार्धातच पूर्ण करण्यात येणार आहे. मोबाईलवरुन प्रत्येक विद्याशाखेच्या काही अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम कसा पोहोचविता येईल, याबाबतच्या चाचण्यांना प्रारंभ झाला आहे.

मोबाईलद्वारे अभ्यासक्रम कसा पोहोचविता येईल, त्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात का ? याची चाचपणी सध्या घेतली जाते आहे. सध्या केवळ काही विद्याशाखांच्या मोजक्याच अभ्यासक्रमांपुरती ही सुविधा मिळणार असली तरी, भविष्यात अन्य कंपन्यांच्या मोबाइलवरदेखील प्रशिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी वेबरेडीओवरील यशवाणी ऐकता येत नाही, त्यांनादेखील मोबाईलवर ती उपलब्ध होईल. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

अत्यल्प शुल्क आकारणीचा प्रयास
विद्यार्थ्यांना केवळ 1 रुपये प्रतिदिन इतके शुल्क त्यासाठी लागणार आहे. या एक रुपयात तो विद्यार्थी त्याच्या विषयांचे वेबरेडीओवरील लेक्चर्स कोणत्याही वेळी आणि दिवसभरात कितीही वेळा ऐकू शकणार आहे.

तीन-चार महिन्यांत होणार प्रारंभ
या सेवेसाठी मागील शैक्षणिक वर्षापासूनच तांत्रिक बाबी आणि अभ्यासक्रमांच्या कन्टेन्टची जुळवाजुळव केली जाते आहे. त्यात काही प्रमाणात यश आले असून आगामी तीन-चार महिन्यात या प्रकल्पाची प्रत्यक्ष अमलबजावणी शक्य होणार आहे. डॉ. अनुराधा देशमुख, प्रकल्प संचालक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ