आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारांगणही खासगीकरणाद्वारे चालवण्याची अाता नामुष्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अर्थिक खडखडाटामुळे फाळके स्मारकासह माेठ्या प्रकल्पांना खासगीकरणातून चालवण्यास देण्याची पालिकेची कसरत थांबलेली नाही. नुकतेच दहा वर्षे पूर्ण झालेल्या तारांगणालाही अाता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थातच पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याची वेळ पालिकेवर अाली अाहे. महापालिकेने त्यासाठी महासभेवर प्रस्ताव पाठवला असून, दहा वर्षांकरिता पीपीपी तत्त्वावर तारांगण दिल्यानंतर महापालिकेला त्यापासून एक रुपयाही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले अाहे. 
 
त्र्यंबकराेडवरील या प्रकल्पाचे ‘यशवंतराव चव्हाण तारांगण विज्ञान केंद्र’ असे नामकरण करून २८ नाेव्हेंबर २०११ राेजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उद‌्घाटन झाले. २६६० क्षेत्रफळाच्या प्रकल्पात ७०० चाैरस मीटर बांधीव क्षेत्र हाेते. या इमारतीवर काेटी रुपये खर्च झाला तर अमेरिकेच्या इव्हान्स अॅण्ड सुदरलॅण्ड यांच्यामार्फत मे. इन्फाेव्हिजन टेक्नाॅलाॅजी, मुंबई यांनी साडेतीन काेटी खर्चून मशिनरी, साॅफ्टवेअर, हार्डवेअर, डाेम तयार झाले. दरम्यान, पहिली पाच वर्षे देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर तारांगणासाठीच्या खर्चाकरिता २० जुलै २०११ राेजी महासभा ठरावान्वये पुढील पाच वर्षांसाठी एक काेटी खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात अाली. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढीद्वारे जुन्या ठेकेदाराकडून कसेबसे कामकाज करून घेतले जात हाेते. दरम्यान, मार्च २०१४ राेजी पीपीपी तत्त्वावर तारांगण चालवण्याची निविदा काढली गेली, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, जुन्या ठेकेदाराची मुदत १९ जुलै २०१६ राेजी संपली. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१६ तारांगणासाठी समिती गठित झाली. समितीत महापाैर अध्यक्ष तर समिती सदस्य म्हणून उपमहापाैर, स्थायी समिती सभापती यांच्यासह सल्लागार सदस्य म्हणून अाेमप्रकाश कुलकर्णी, संशाेधक अभियंता अविनाश शिराेडे, अपूर्वा जाखडी, अवकाश शिक्षक सुजाता बाबर, प्रा. जयदीप शहा यांना सहभागी केले. या समितीने तारांगण चालवण्यासाठी १९ जुलै २०१७ पर्यंत जुन्या ठेकेदारास मुदतवाढ दिली. मात्र, त्या पुढील कालावधीसाठी पीपीपी तत्त्वावर प्रकल्प चालवण्यास दिला जाणार अाहे. 

तारांगणात काय? 
याठिकाणी विविध वैज्ञानिक प्रयाेग डी पद्धतीने दाखविले जातात. मुख्य इमारतीत स्काय थिएटर, खगाेलशास्त्रीय गॅलरी, प्रतिक्षालय, सर्व्हर रूम, व्यवस्थापक कार्यालय, विशेष अतिथी कक्ष अाहे. ४५ मिनिटांच्या शाेसाठी प्राैढांसाठी ५० रुपये तर लहान मुलांना २५ रुपये अाकारले जातात. 

अशी अाहे स्थिती 
{३१ मार्च २०१७ पर्यंत ४१ हजार १२१ प्राैढ तर १,१५,८८० लहान मुले अशा एक लाख ५७ हजार प्रेक्षकांनी प्रयाेग बघितला. 
{ इन्फाेव्हिजन टेक्नाॅलाॅजी यांच्यामार्फत देखभाल, दुरुस्तीसाठी वार्षिक १९ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम अदा हाेते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...