आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुक्त’च्या छपाईचे काम स्थानिकांनाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दहाकाेटी रुपयांची उलाढाल असलेल्या मुद्रकांनाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुस्तक छपाईचे काम देण्याची अट शिथिल करण्यात अाल्याने यापुढे स्थानिक मुद्रकांनाही हे काम देता येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मुद्रकांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी दिली.
२४ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक मुद्रणदिनाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा मुद्रक संघातर्फे रविवारी (दि. २१) नाशिक क्लब येथे अायाेजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे नियंत्रक विवेक गोसावी, मुद्रक संघाचे अध्यक्ष सुधीर रत्नपारखी, उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, सचिव अजित मोडक, सहसचिव मनोज जैन आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रणकलेचे जनक जोहान गटेनबर्ग यांना अभिवादन करण्यात आले. मुद्रकांनी अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अावश्यक असल्याचे मत गाेसावी यांनी व्यक्त केले.

रत्नपारखी यांनी मुद्रणालयांची वाढती संख्या पाहता नवी वेगवान मुद्रणकामे कमी पडत असल्याचे सांगितले. यावेळी ज्येष्ठ मुद्रकांचा सत्कार करण्यात आला. तसेच, ‘नाशिक मुद्रा’ या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अभिजित खोत, प्रदीप जगताप, सुनील देशपांडे, सत्यनारायण पांडे, विनायक तांबे, बाळासाहेब पठाडे, नवनीत वजीरे, दिलीप शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुद्रकांच्या स्नेहमेळाव्यानिमित्त ‘गाणी सर्वांच्या आवडीची’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात रागिणी कामतीकर यांनी हिंदी, मराठी गाणी सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

यांचा झाला सत्कार
ज्येष्ठ मुद्रक धनराज राका, दशरथ तांबे, रमेश वनकर, डाॅ. श्रीराम देशपांडे, निनजोर हेगडे, शरद अंधारे, मधुकर महाले, रामेश्वर सारडा, जयवंत पाटील, खंडेराव खुळे यांचा सत्कार करण्यात आला.