आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गानकोकिळा लता मंगेशकर यांना मुक्त विद्यापीठ डी.लिट.पदवीने सन्मानित करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गानकोकिळा लता मंगेशकर - Divya Marathi
गानकोकिळा लता मंगेशकर
नाशिक- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतर्फे संगीत क्षेत्रातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना डी.लिट. पदवीने सन्मानित करण्‍यात येणार असल्याचे माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत एका विशेष समारंभात हा लतादीदींचा हा सन्मान करण्‍यात येणार आहे. 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 23 वा दीक्षान्त समारंभ मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात सायंकाळी साडेचारला होणार आहे. दीक्षान्त समारंभात यंदा 1 लाख 40 हजार 484 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. दीक्षान्त समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती व दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रभारी कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर हे असतील.

पुढील स्लाइडवर वाचा...  युवावर्गाने मनापासून स्वीकारली ‘मुक्त शिक्षण’ पद्धती
बातम्या आणखी आहेत...