आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाची एमबीए प्रवेश परीक्षा २३ ऑगस्टला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील एमबीए शिक्षणक्रमाची प्रवेश पात्रता परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा २३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
एमबीए शिक्षणक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिसरी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. २८ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येतील. दि. १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र मिळणार असून २३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे एमबीए शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुन्हा संधी मिळणार आहे.