आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुक्त विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नव्याने सुरू केलेल्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने विद्यापीठ प्रशासनाने या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी २४ मे रोजी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढे ढकलली असून त्यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक १ जून रोजी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. मुक्त विद्यापीठामार्फत नियमित व पूर्णवेळ पीएचडी सुरू करण्यात आली असून पूर्णवेळ राबविल्या जाणार्‍या या शिक्षणक्रमासाठीची २४ मे रोजी होणारी प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.

विद्यापीठात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या ४६ जागांसाठी पीएचडीसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यभरातून सुमारे १५०० हून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता १ जूनला परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...